शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
3
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
4
"मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
5
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
6
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
7
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
8
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
9
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
10
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
11
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
12
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
13
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
14
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
15
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
16
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
17
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
18
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
19
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
20
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद

जिल्ह्यात भाजपच्या वतीने आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 11:24 PM

आंदोलनात नागरिकांसह, भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

राज्यातील सत्ताधारी सर्वच घटकावर अपयशी ठरत असून महिलांवर वाढते अत्याचार, शेतकऱ्यांच्या फसवणुकीबाबत मंगळवारी राज्यभर भाजपतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. रायगड जिल्ह्यातील सर्वत्र तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने ठिकठिकाणी मोर्चे काढून सत्ताधाऱ्यांचा निषेध नोंदविण्यात आला. कोकणातील विकासकामांना दिलेली स्थगिती, एलईडी मासेमारीविरोधात कठोर कारवाई विलंबामुळे सत्ताधाºयावर जोरदार टीका करण्यात आली. अलिबाग-मुरुड हा रस्ता लवकर पूर्ण न झाल्यास जन आंदोलनाचा इशाराही या वेळी भाजपच्या वतीने देण्यात आला. जिल्ह्यातील सर्वत्र तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात नागरिकांसह, भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.नुकसानभरपाईची प्रमुख मागणी अलिबाग : राज्य शासनाच्या धोरणांच्या निषेधार्थ मंगळवारी अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते. या वेळी मागण्यांचे निवदेन अलिबाग तहसीलदार सचिन शेजाळ यांना देण्यात आले. सकाळी ११ ते ३ या वेळेत रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले होते. अति पर्जन्यवृष्टीमुळे झालेल्या शेतमालाची नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे. महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी तसेच गुन्हेगारांना शिक्षा बसविण्यासाठी कठोर कायदे करावे, या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांचा समावेश निवेदनात करण्यात आला होता. अ‍ॅड. अंकित बंगेरा, हेमंत दांडेकर, सतीश लेले, दर्शन प्रभू इतर भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते.खालापुरात तहसीलदार नसल्याने कार्यकर्त्यांकडून संतापखोपोली : आघाडी सरकारला विविध पातळीवर आलेल्या अपयशाचा आरोप करीत भारतीय जनता पक्षाच्या खालापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी निषेध करीत धरणे आंदोलन केले. या वेळी निवेदन देण्यास गेलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार उपस्थित नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करीत घोषणा दिल्या.राज्यात सुमारे ५०० ठिकाणी भाजपच्या वतीने तालुक्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले. खालापूर येथे तहसील कार्यालयाच्या बाहेर माजी आमदार देवेंद्र साटम व महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा अश्विनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघटक शरद कदम, तालुकाध्यक्ष बापू घारे, जिल्हा कोषाध्यक्ष सनी यादव, श्रीकांत पुरी, रामदास ठोंबरे, निवृत्ती पिंगळे, इंदरमल खंडेलवाल, तुकाराम साबळे, प्रशांत पाटील, शोभा काटे, सूर्यकांत देशमुख, हेमंत नांदे आदी सहभागी झाले होते.दरम्यान, कार्यकर्ते निवेदन घेऊन तहसील कार्यालयात पोहोचले, तेव्हा तहसीलदारांची गैरहजेरी व त्यांच्या दालनाला कुलूप पाहून कार्यकर्ते संतापले. या वेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. कार्यालयात मोर्चेकरांच्या वतीने दिलेले निवेदन नायब तहसीलदार एस. जोगी यांनी स्वीकारल्यानंतर कार्यकर्ते शांत झाले.म्हसळेत राज्य सरकारविरोधात निषेधम्हसळा : म्हसळा येथील तहसील कार्यालयासमोर भाजपने आंदोलन करून महाआघाडी सरकारचा निषेध नोंदवला. यात रायगड जिल्हा उपाध्यक्ष कृष्णाजी कोबनाक, तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर, माजी तालुका अध्यक्ष शैलेश पटेल, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस महेश पाटील, रायगड जिल्हा चिटणीस सरोज म्हशीलकर, तालुका सरचिटणीस तुकाराम पाटील, उपाध्यक्ष भालचंद्र करडे, अल्पसंख्याक अध्यक्ष समीर धनसे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते.सत्ताधारी पक्षाविरोधात निवेदनपोलादपूर : भाजप तालुका अध्यक्ष प्रसन्ना पालांडे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले होते. भाजपच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले व सत्ताधारी पक्षाचा निषेध करण्यात आला. आंदोलनात राजू धुमाळ, मनोज भागवत, राजा दीक्षित, समीर सुतार, एकनाथ कासुर्डे, भारती कदम, उज्ज्वल शेठ, प्रीती बुटाला, महेश निकम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.उरण आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजीउरण : महाविकास आघाडीच्या फसव्या कारभाराविरोधात मंगळवारी उरण तहसील कार्यालयावर भाजपच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. तालुका अध्यक्ष रवि भोईर यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या धरणे आंदोलनात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी सरकारने घोषणांची पूर्तता न करता शेतकºयांची फसवणूक केली आहे. आघाडी सरकारच्या बेफिकिरीमुळे राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. ढासळती कायदा सुव्यवस्था, आर्थिक गैरव्यवहार यांच्यात दिवसेंदिवस वाढ होत असताना महाविकास आघाडी सरकार बघ्याची भूमिका घेत आहे.या सरकारमध्ये निर्णय क्षमता नसल्याने ठोस उपाययोजना होत नाही, त्यामुळे त्याचा निषेध करण्यासाठी आणि सरकारला जाब विचारण्यासाठीच धरणे आंदोलन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. आंदोलनात उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, पंडित घरत, प्रदीप नाखवा, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.राज्य सरकारविरोधात भाजपचा एल्गारबोर्ली-मांडला : मुरुडमध्ये तहसीलदार कार्यालयासमोर तालुका भाजपच्या वतीने एक दिवसीय यशस्वी धरणे आंदोलन करण्यात आले. तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर यांच्या उपस्थितीत तहसीलदार गमन गावित यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सरकार विरोधी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.भाजपचे तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर, उपाध्यक्ष धनेश गोगर, ज्येष्ठ कार्यकर्ते जनार्दन उर्फ अण्णा कंधारे, शहराध्यक्ष प्रवीण बैकर, माजी तालुका अध्यक्ष जयवंत आंबाजी, शैलेश खोत, मेधा कुलकर्णी, नाजिम सुभेदार, प्रीती भाटकर, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष आमिर खानजादे, विनोद भगत, नरेश वारगे, वसंत बेडेकर, शहर युवक अध्यक्ष अभिजीत पानवलकर, शहर उपाध्यक्ष जगदीश पाटील, बाळकृष्ण कारभारी, संजय भायदे, संजय ठाकूर, वसीम नाडकर, बाबू भाटकर, सरपंच सुदाम वाघिलकर, युवा मोर्चा अध्यक्ष दीपक गीते, हरेश पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.तालुक्यातील जमिनीचे सातबारा व इतर अधिकारात असलेल्या खारभूमी लाभक्षेत्रात समाविष्ट हा शेरा वगळण्यात यावा, तसेच मुरुड, अलिबाग, रोहा येथील रस्त्यांच्या निकृष्ट कामांची विभागामार्फत चौकशी करून दर्जेदार रस्ते करण्यात यावेत, अशी मागणी या वेळी निवेदनाद्वारे करण्यात आली.