वाळीत टाकल्याची तक्रार केली म्हणून विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 05:30 IST2018-05-15T05:30:58+5:302018-05-15T05:30:58+5:30
वाळीत टाकल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केल्याचा राग मनात धरून, महिलेला मारहाण व विनयभंग केल्याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

वाळीत टाकल्याची तक्रार केली म्हणून विनयभंग
महाड : वाळीत टाकल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केल्याचा राग मनात धरून, महिलेला मारहाण व विनयभंग केल्याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. शेल देऊळकोंड येथे १३ मे रोजी ही घटना घडली. या प्रकरणी मीना गणेश आंब्रे यांनी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
गणेश आंब्रे यांच्या जागेतील मंदिराचा जीर्णोद्धार करण्याबाबत त्यांनी नकार दिला होता. त्यानंतर, २०१४ पासून शेल देऊळकोंड येथील काही ग्रामस्थांनी त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला होता. याबाबत गणेश आंब्रे यांनी पोलीस ठाण्यात मार्च २०१८ला तक्रार केली होती.