तळोजात हिंदू मुस्लिम एकात्मतेचा संदेश

By वैभव गायकर | Updated: January 22, 2024 18:15 IST2024-01-22T18:13:29+5:302024-01-22T18:15:03+5:30

तळोजा शहरात काढण्यात आलेल्या रॅली दरम्यान मुस्लिम बांधव स्वयंस्फूर्तीने या रॅलीत सहभागी झाले.

message of Hindu Muslim unity in taloja | तळोजात हिंदू मुस्लिम एकात्मतेचा संदेश

तळोजात हिंदू मुस्लिम एकात्मतेचा संदेश

पनवेल - आयोध्यामध्ये राम मंदिराची प्रतिष्ठापना झाल्यानंतर देशभरात जल्लोष साजरा करण्यात आला. पनवेलमध्ये देखील हा जल्लोष साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे तळोजात हिंदू मुस्लिम एकात्मतेचा संदेश देण्यात आला. तळोजा येथील मुस्लिम बांधवानी हिंदू बांधवाना गुलाबाचे फुल भेट दिले.       

तळोजा शहरात काढण्यात आलेल्या रॅली दरम्यान मुस्लिम बांधव स्वयंस्फूर्तीने या रॅलीत सहभागी झाले. यावेळी भाजप नेते माजी नगरसेवक हरेश केणी, प्रल्हाद केणी यांच्यासह उपस्थित हिंदू बांधवाना गुलाबाचे फुल अनिस शेख, याकूब सलमान, जावेद आदींनी भेट दिले. तळोजा शहरात निघालेल्या रॅलीला पिण्याचे पाणी देखील मुस्लिम बांधवानी उपलब्ध करून दिले.

तळोजा शहरात दिलेल्या हिंदू मुस्लिम एकतेचे कौतुक सर्वच स्तरातून करण्यात येत आहे. तळोजा शहरात यापूर्वी देखील मुस्लिम बांधवानी पुढाकार घेता हिंदू मुस्लिम एकात्मता जोपासली असल्याचे हरेश केणी यांनी सांगितले. मुस्लिम बांधव आमच्या आनंदात सहभागी झाल्याने आमचा आनंद द्विगुणित झाला असल्याचे केणी यांनी यावेळी सांगितले.

Web Title: message of Hindu Muslim unity in taloja