“मेरा देश मेरा गुरुर” देशभक्ती पर गीत व सांस्कृतिक नृत्य कार्यक्रम संपन्न

By निखिल म्हात्रे | Updated: January 26, 2024 14:03 IST2024-01-26T14:02:43+5:302024-01-26T14:03:51+5:30

देशभक्ती पर गीत व सांस्कृतिक नृत्य कार्यक्रम महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाला.

mera desh mera gurur patriotic song and cultural dance program concluded in alibaug raigad | “मेरा देश मेरा गुरुर” देशभक्ती पर गीत व सांस्कृतिक नृत्य कार्यक्रम संपन्न

“मेरा देश मेरा गुरुर” देशभक्ती पर गीत व सांस्कृतिक नृत्य कार्यक्रम संपन्न

निखिल म्हात्रे,  लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग - रायगड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मेरा देश मेरा गुरुर हा देशभक्ती पर गीत व सांस्कृतिक नृत्य कार्यक्रम महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाला.

मेघा चित्रमंदिर येथे आयोजित कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,उप वनसंरक्षक अलिबाग राहुल पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी सत्यजीत बडे यांसह विविध अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

दिव्यांग व विशेष कलाकरांनी सादर केलेले कार्यक्रम कौतुकास्पद आहे. निसर्गाने या व्यक्तींना विशेष देणगी दिलेली असते त्याचा प्रचिती या कार्यक्रमाच्या निमित्ताने आली. अतिशय दिमाखदार व आकर्षक तसेच प्रभावी नृत्य व गीत सादर करणाऱ्यां सर्व कलाकारांचे मंत्री आदिती तटकरे यांनी कौतुक करुन त्यांना शुभेच्दा दिल्या तसेच सन्मानही केला. गीता पडुवाल आणि टीम ने उत्कृष्ट संस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचे  प्रास्ताविक जिल्हा पोलीस  अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले.

Web Title: mera desh mera gurur patriotic song and cultural dance program concluded in alibaug raigad