शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कामाच्या ताणामुळे बिघडतय मानसिक आरोग्य - डॉक्टर अनिल डोंगरे

By निखिल म्हात्रे | Updated: October 10, 2023 19:31 IST

आठ तास ड्युटीच्या वेळा ठरवून दिलेल्या असल्या तरीही आजही अनेक ठिकाणी पोलिसांना १२ तास ऑन ड्युटी राहावे लागते.

निखिल म्हात्रे, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग - कामाचा ताण, वेगेवगळ्या कारणांमुळे लागणारे बंदोबस्त, जेवणाच्या वेळांना लागणारी कात्री यामुळे पोलिसांच्या प्रकृतीवर दुष्परिणाम होत आहेत. हे परिणाम केवळ शारीरिक स्वरूपाचे नसून सतत तणावग्रस्त अवस्थेत राहिल्यामुळे मानसिक अनारोग्याच्या तक्रारीही वाढत आहे. या तक्रारींकडे वेळीच लक्ष दिले नाही तर त्यातून आरोग्य अधिक बिघडत जाते, त्यामुळे कामाबरोबरच स्वताची काळजी घ्या असे अवाहन ज्येष्ठ माणसोपचार तज्ञ डॉक्टर अनिल डोंगरे यांनी पोलिस बांधवांना केले आहे. 

जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग रायगड जिल्हा रायगड पोलीस व माणुसकी प्रतिष्ठान सामाजिक संस्था रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह आणि आयुष्यमान भव शिबिराच्या आयोजन जंजिरा सभागृह पोलीस मुख्यालय अलिबाग रायगड येथे करण्यात आले होते. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे, निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्य संपर्क डाॅ अशिष मिश्रा, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकीत्सक शितल जोशी, मानसोपचार तज्ज्ञ डाॅ. अर्चना सिंह, मानसशास्त्रज्ञ स्वप्निल भोपी आदी उपस्थित होते.

आठ तास ड्युटीच्या वेळा ठरवून दिलेल्या असल्या तरीही आजही अनेक ठिकाणी पोलिसांना १२ तास ऑन ड्युटी राहावे लागते. सार्वजनिक सण, समारंभ, मोर्चे, नेत्यांचे दौरे, शहरातील सुव्यवस्था राखण्याचा ताण पोलिसांवर येतो. वेळीअवेळी जेवण , पुरेशी झोप नसल्यामुळे पोलिसांमध्ये लठ्ठपणा वाढत आहे. या लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह या तक्रारींमध्येही वाढ झाली आहे. सतत उन्हात उभे राहिल्यामुळे डोकेदुखी बळावते. वेगवेगळ्या प्रकारची दुखणी मागे लागतात. त्यामुळे पोलिस बांधवानी स्वताची काळजी घेणे गरजेचे असल्याचे डाॅ. अनिल डोंगरे यांनी सांगितले.मानसिक आजार आणि ताण-तणावाला बळी न पडता त्यावर उपचार घेण्यासाठी लोकांना प्रेरित करणे गरजेचे आहे. मागील तीस-पस्तीस वर्षांपूर्वी मानसिक आरोग्य विषयी असणारी अंधश्रद्धा आणि गैरसमजुती होत्या. आता त्यामध्ये प्रचार आणि प्रसार होत आहे. याबाबत अधिक प्रमाणात याची जनजागृतीची गरज आहे. रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार विभाग चांगले काम करत आहे. त्यांच्या अनेक उपक्रमांना नागरीकांनी उत्तम प्रतिसाद द्यावा असे आवाहन केले. - सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधिक्षक.

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्यalibaugअलिबाग