आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा हे मीनाक्षी पाटील यांनी दाखवले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली भावना

By राजेश भोस्तेकर | Updated: April 5, 2024 15:15 IST2024-04-05T15:12:41+5:302024-04-05T15:15:32+5:30

मुख्यमंत्री यांनी घेतली पाटील कुटुंबाची भेट

meenakshi patil showed how an ideal public representative should be said cm eknath shinde expressed his feelings | आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा हे मीनाक्षी पाटील यांनी दाखवले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली भावना

आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा हे मीनाक्षी पाटील यांनी दाखवले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली भावना

राजेश भोस्तेकर, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग : राजकारणाच्या पलिकडे जाऊन मीनाक्षी पाटील यांनी सर्वांशी सबंध जोडले होते. आमच्यासोबत त्या आमदार, राज्यमंत्री म्हणून काम केले होते. त्यावेळी प्रत्येकाला प्रेमाने, मायेने, जवळ करून मदत करण्याची त्याची भावना होती. एक आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा हे त्यांनी आपल्या कामातून दाखवले. मच्छीमारी भूमिपुत्र यानचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी खूप पाठपुरावा केला होता. एखादे काम हाती घेतल्यानंतर ते होई पर्यंत स्वस्थ बसत नव्हते .अशा व्यक्तिमत्त्वाला महारष्ट्र मुकला आहे. अशी भावना मुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त क ली आहे. 

राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचे दुर्धर आजाराने निधन झाले. पाटील कुटुंबीयांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवार ५ मार्च महिन्यात रोजी सात्वनपर भेट घेतली. आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार विनय नातू हे सुध्दा यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज एकनाथ शिंदे यांनी मीनाक्षी पाटील यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून यावेळी आदरांजली वाहिली. मीनाक्षी पाटील यांच्यासारख्या सर्वांना आपुलकीने वागणाऱ्या नेत्याला महारष्ट्र मुकला असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: meenakshi patil showed how an ideal public representative should be said cm eknath shinde expressed his feelings