शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

माथेरानमध्ये मुबलक पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 11:13 PM

पर्यटन व्यवसायाला चिंता नाही : एमजीपीमार्फत पाणीपुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : महाराष्ट्र पाणीटंचाईने होरपळत असताना त्यांच्या झळा रायगड जिल्ह्यातही सोसाव्या लागत आहेत. मात्र, रायगड जिल्ह्यातील आवडते पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमध्ये पिण्यासाठी मुबलक पाणीसाठा असल्याने पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.माथेरान या पर्यटनस्थळाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा केला जातो. नेरळ-कुंभे तसेच येथील शार्लोट तलावातून पाणीपुरवठा केला जातो. माथेरानकरांना पाणीटंचाईच्या झळा लागू नये यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने योग्य नियोजन केले असून, शार्लोट तलावाच्या पाण्याचा उपसा केला नसल्यामुळे मे महिन्यापर्यंत २८ फूट पाणीसाठा शिल्लक आहे.आॅक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत नेरळ-कुंभे येथून पाणी दिले जाते व मार्चपासून शार्लोट तलावातून पाण्याचा उपसा होतो. त्यामुळे ६० फूट खोल व अर्धा किलोमीटर रुंद असलेल्या शार्लोट तलावातून अडीच महिन्यांत फक्त ३२ फूट पाणीउपसा झाला आहे व २८ फूट पाणी शिल्लक असल्याने माथेरानमध्ये मुबलक पाणीसाठा आहे.माथेरानला पाणीपुरवठा करताना आम्ही नियोजनबद्ध पाणीपुरवठा केला. नेरळमधून एक एमएलडी व माथेरान शार्लोट तलावातून पाच एमएलडी पाणी माथेरानकरांना देत आहोत, त्यामुळे १५ जूनपर्यंत विनाव्यत्यय माथेरानकरांना पाणी मिळणार आहे.मात्र, जर वीजपुरवठा खंडित झाला तर लोकांना पाणी देण्यास अडचण निर्माण होते, अशी माहिती राजेंद्र हावळ उपअभियंता यांनी दिली. यावर्षी एमजेपीने नियोजनबद्ध काम करून पाणीपुरवठा केला आहे, त्यामुळे या वर्षी आम्हाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागले नाही ही पर्यटन व्यवसायासाठी चांगली बाब असल्याचे पवन गडवीर यांनी सांगितले.