शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

मरणाच्या दारात असणाऱ्या जन्मदात्याला लिव्हर देऊन वाचविले विवाहित मुलीने प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 23:40 IST

A married girl saved the life of a dying father : अक्षताचे मनोबल वाढवण्यासाठी व आपल्या सासऱ्याचे प्राण वाचविण्यासाठी अक्षताचे पती पंकज पाटील यांनीही पित्याला तूझे लिव्हर देण्यासाठी प्रोत्साहन दिले.

मधुकर ठाकूर

उरण : आजकालच्या युगात आई-वडिलांच्या मालमत्तेतुन हिस्सा मागणाऱ्या मुली आपण नेहमीच पाहात आलो आहोत. पण मरणाच्या दारात असणाऱ्या जन्मदात्या पित्याचे प्राण वाचविण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या मुली खूप कमी पाहायला मिळतात.अशीच एक  चिरनेर गावातील मुलगी अक्षता खारपाटील हिने आपल्या जन्मदात्या पित्याला मरणाच्या दारातून बाहेर काढण्यासाठी चक्क आपले लिव्हर देऊन जीवनदान देण्याचे काम करुन समाजात एक आदर्श निर्माण केला आहे.

चिरनेर येथील प्रशांत खारपाटील ( वय ४५) यांना कोरोनात लिव्हर सिराँसीनचा आजार जडला.वैद्यकीय निदानानंतर त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांटची आवश्यकता असल्याची  माहिती नवीमुंबई येथील एका रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबियांना सहा महिन्यांपूर्वी दिली.त्यामुळे कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर  कुटुंबियांचा आधारस्तंभ असणाऱ्या प्रशांत याचे प्राण कोण वाचविणार अशा प्रश्न प्रशांत यांच्या कुटुंबियां समोर आ वासून उभा राहिला. मरणाच्या दारात असलेल्या आपल्या जन्मदात्यासाठी प्रशांत खारपाटील यांची विवाहित जेष्ठ कन्या अक्षता हिने  लिव्हर देण्याची इच्छा कुटुंबिय  तसेच डॉक्टरां जवळ व्यक्त केली.यावेळी अक्षताचे मनोबल वाढवण्यासाठी व आपल्या सासऱ्याचे प्राण वाचविण्यासाठी अक्षताचे पती पंकज पाटील यांनीही  पित्याला तूझे लिव्हर देण्यासाठी प्रोत्साहन दिले.पतीकडूनमिळालेल्या पाठबळामुळे अक्षताचा आत्मविश्वास आणखीनच दुणावला.त्यानंतर अक्षताच्या संमतीनेच मुंबई ( परेल ) येथील ग्लोबल रुग्णालयातील डॉक्टर रवि मोहंका व त्यांच्या पुर्ण टीमच्या बारा तासांच्या अथक प्रयत्नाने प्रशांत यांच्यावर नूकतीच लिव्हर ट्रान्सप्लांटची यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडली.आज प्रशांत व त्यांची मूलगी अक्षता हे दोन्ही बाप लेक सुखरूप आपल्या घरी परतले आहेत. 

समाजात एकीकडे मालमत्तेतुन हिस्सा मिळावा यासाठी   आई-वडिलांना कोर्टकचेरीची पायरी चढविण्यास प्रवृत्त करताना मुलं मुली आढळून येतात.तर दुसरीकडे अक्षता सारख्या विवाहित मुलीने जन्मदात्याच्या प्रेमापोटी लिव्हर देऊन समाजात नवा आदर्श घालून दिला आहे. अक्षताने लिव्हर दिले नसते आणि प्रशांत खारपाटील यांची लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया झाली नसती तर ते जगू शकले नसते अशी प्रतिक्रिया ग्लोबल रुग्णालयातील डॉक्टर रवि मोहंका यांनी व्यक्त केली.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलOrgan donationअवयव दान