दिवाळीसाठी रोह्यातील बाजारपेठ सजल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 23:22 IST2019-10-22T23:21:36+5:302019-10-22T23:22:28+5:30
मंदीचे सावट : आकाशकंदील, रांगोळी, विविध प्रकारच्या वस्तूंनी सजली दुकाने

दिवाळीसाठी रोह्यातील बाजारपेठ सजल्या
रोहा : दोन दिवसांवर दिवाळी येऊन ठेपल्याने बाजारपेठेतील दुकाने आकाशकंदील, रांगोळी आदी विविध प्रकारच्या भेटवस्तूंनी बहरलेली आहेत. परिणामी, रोह्यातील बाजारपेठ आता सजल्या असून भरगच्च भरलेल्या मालाने रात्रीच्या रोषणाईत खरेदीदारांना आकर्षित करत असल्याचे दिसून येत आहेत.
दिवे, रोषणाई, फटाके नागरिक दिवाळी सणानिमित्त आवर्जून खरेदी करत असतात. बहीणभावाचे नाते अधिक घट्ट करणारा दिवाळीतील भाऊबीज हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्यानिमित्ताने विविध प्रकारच्या वस्तू भेट देण्याची प्रथा आजही कायम आहे. या विविध प्रकारच्या भेटवस्तूंनी बाजारपेठ सजल्या असल्या तरी आर्थिक मंदीचे सावट मात्र आजही कायम आहे, त्यामुळे व्यापारी चिंताग्रस्त आहेत.
रोहा तालुक्यातील ग्रामीण भागातून खास खरेदीसाठी रोहा शहरात येत असतात. जवळच धाटाव एमआयडीसी असल्याने व कंपनीत जाणाऱ्या कामगारांची संख्या मोठी असल्याने आता निवडणुका संपल्याने खरेदीसाठी ग्रामीण भागातील नागरिक व महिला खरेदीसाठी बाहेर पडतील, अशा आशेवर व्यापारी आहेत.
यंदाही लाखो रुपयांच्या मालाची खरेदी करून आम्ही दुकानात माल भरलेला आहे. मात्र, निवडणुका होऊनही गिºहाइकांनी दीपावलीच्या खरेदीकडे पाठ फिरवल्याचे दिसून येते. आर्थिक मंदीचा फटका बसल्याचेही काही प्रमाणात जाणवत आहे.
- नारायण कान्हेकर, व्यापारी
आर्थिक मंदीच्या झळा अजूनही कायम आहेत. खिशात पैसेच आले नाही तर खरेदी कुठून करणार. आम्हीही लॉण्ड्री व्यावसायिक असून पहिल्यासारखे गिºहाईक येत नाहीत. त्यामुळे आमच्याकडे पैसा येत नसेल तर दिवाळी असून ही खरेदी कशी करणार?
- नंदकुमार राक्षे