मराठी भाषा सर्वोत्तम आली पाहिजे - चांदले

By Admin | Updated: February 20, 2016 02:03 IST2016-02-20T02:03:45+5:302016-02-20T02:03:45+5:30

महाराष्ट्राची मूळ भाषा ही मराठी आहे. सरकार दरबारी सर्व व्यवहार मराठीतच होतात. स्पर्धा परीक्षा एमपीएससी व यूजीसी या परीक्षा सुद्धा मराठीत होत आहेत.

Marathi language should be the best - Chandel | मराठी भाषा सर्वोत्तम आली पाहिजे - चांदले

मराठी भाषा सर्वोत्तम आली पाहिजे - चांदले

आगरदांडा : महाराष्ट्राची मूळ भाषा ही मराठी आहे. सरकार दरबारी सर्व व्यवहार मराठीतच होतात. स्पर्धा परीक्षा एमपीएससी व यूजीसी या परीक्षा सुद्धा मराठीत होत आहेत. जर आपल्याला मुख्य प्रवाहात सामील व्हायचे असेल तर मराठी भाषा सर्वोत्तम आली पाहिजे. केवळ नावापुरते मराठी भाषा न शिकता त्यावर प्रभुत्व मिळवणे आवश्यक आहे. ज्यावेळी मुस्लीम विद्यार्थी मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवतील तेव्हा आपल्या समाजाचे लोक प्रांताधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी झालेले दिसून येतील. तेव्हा मुस्लीम समाजातील विद्यार्थ्यांनी मराठी भाषेवर पारंगतता मिळवावी, असे प्रतिपादन इक्बाल चांदले यांनी मुरुड तालुक्यातील पंचक्रोशी उसरोली येथील अंजुमन ई इस्लाम जंजिरा हायस्कूल या शाळेचा परितोषिक वितरणाच्या वेळी केले.
यावेळी २०१५ ते २०१६ सर्वोत्कृष्ट विद्यार्थी मोहिमेनुसार विद्यार्थ्यांनी सायमा महमुद झोंबरकर यांची निवड करण्यात आली. त्यांना मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. तसेच यावर्षीचे आदर्श शिक्षक म्हणून सिराज शेख यांची निवड केली व त्यांचाही मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले. यावेळी इफ्रान हालडे, दिलावर महाडकर आदी उपस्थित होते.(वार्ताहर)

Web Title: Marathi language should be the best - Chandel