शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

"सगेसोयऱ्यांबाबत कायदा करा; तातडीने अंमलबजावणी करा, अन्यथा १० फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषण"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 12:28 PM

Manoj Jarange Patil: शासनाने सगेसोयरेबाबत अधिसूचना काढली, मात्र त्याची अंमलबजावणी अद्यापही झाली नाही. (Maratha Reservation) त्यामुळे प्रमाणपत्र वाटप हाेत नाही. सगेसोयरेबाबत कायदा तयार करून तातडीने अंमलबजावणी करा, अन्यथा १० फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषणाचे अस्त्र उगारणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी शासनाला दिला. 

अलिबाग- शासनाने सगेसोयरेबाबत अधिसूचना काढली, मात्र त्याची अंमलबजावणी अद्यापही झाली नाही. त्यामुळे प्रमाणपत्र वाटप हाेत नाही. सगेसोयरेबाबत कायदा तयार करून तातडीने अंमलबजावणी करा, अन्यथा १० फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषणाचे अस्त्र उगारणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी शासनाला दिला. 

मराठा आरक्षणाच्या मागणीला यश आल्यानंतर राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेनंतर मंगळवारी प्रथमच मनोज जरांगे पाटील छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावरील समाधीला नतमस्तक होण्यासाठी दाखल झाले. यावेळी किल्ल्यावर चित्त दरवाजामार्गे पायी जाण्याचा निर्धार हजारो कार्यकर्त्यांसह घेऊन रायगडावर दाखल झाले. रायगडावर ऊर्जा मिळते, ती इतरत्र कुठे मिळत नाही. ही ऊर्जा घेऊन पुढील प्रवास सुरू करणार असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला नतमस्तक होऊन पुढे लढण्याचा निर्णय घेतल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

आरक्षणाशिवाय स्वस्थ बसणार नाहीप्रत्येक घराघरातील मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. एकही पाऊल मागे हटवणार नाही. मी आंदोलन थांबवले नाही आणि थांबवणारही नाही. दस्तऐवज सापडो अथवा न सापडो त्यासाठी सगेसोयरे कायदा मोठा आहे. मुंबईत केलेला लढा हा सर्वसामान्यांसाठी होता. सगेसोयरेबाबत जी व्याख्या वाटते ती अभ्यासकांनी दोन ओळीत १५ दिवसांत कळवावी. आरक्षण मिळाल्याशिवाय मी हटणार नाही, असा इशारा सरकारला दिला आहे.

सरकारची भूमिका दुटप्पीशासनाने अधिसूचना काढली असून, त्यादृष्टीने त्वरित हालचाली होणे आवश्यक होते. मात्र, शासनातर्फे तसे होताना दिसत नाही. समितीकडूनही काम होताना दिसत नाही. हैदराबादचे गॅझेट अद्यापही समितीने स्वीकारले नाही. सगेसोयऱ्यांबाबत अर्ज दाखल होऊनही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. याबाबत माहिती घेतली आहे. हैदराबादचे गॅझेट स्वीकारून त्याला शासकीय नोंदीचा दर्जा द्या. १९८४ ची जनगणनाही समितीला द्यावी. १९०२ चा दस्त ऐवज अद्याप स्वीकारला गेलेला नाही. सगेसोयरेबाबत दिलेली राजपत्रित अधिसूचना टिकवणे सरकारची जबाबदारी आहे. मात्र, सरकारचे दुटप्पी धोरण दिसत आहे, असा निशाणा जरांगे पाटील यांनी सरकारवर साधला.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार