उरणचे मनोज ठाकूर यांना उत्कृष्ट औषध विक्रेता पुरस्कार! 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 05:11 PM2023-12-05T17:11:58+5:302023-12-05T17:12:32+5:30

महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य फार्मसीच्या कौन्सिल (MSPC) वतीने दरवर्षी जागतिक औषध निर्माता दिन"साजरा केला जातो.

Manoj Thakur of Uran was awarded the best medicine salesman! | उरणचे मनोज ठाकूर यांना उत्कृष्ट औषध विक्रेता पुरस्कार! 

उरणचे मनोज ठाकूर यांना उत्कृष्ट औषध विक्रेता पुरस्कार! 

- मधुकर ठाकूर

उरण : उरण येथील मनोज ठाकूर यांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुंबई -कोकण विभागातील राज्यस्तरीय उत्कृष्ट फार्मासिस्ट या विशेष सन्मानाचे मानकरी ठरले आहेत.गुरुवारी महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य फार्मसीच्या कौन्सिलने मुंबईत त्याचा एमएसपीसीचे अध्यक्ष अतूल आहिरे यांच्या हस्ते गौरव करुन सन्मानित करण्यात आले. 

महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य फार्मसीच्या कौन्सिल (MSPC) वतीने दरवर्षी जागतिक औषध निर्माता दिन"साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून फार्मासिस्ट तसेच संस्था, संघटना यांच्या मधून मुंबई -कोकण विभागातील फार्मासिस्ट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्याला पारितोषिक देऊन गौरविण्यात येते.यावर्षी मुंबई-कोकण विभागातुन उत्कृष्ट फार्मासिस्ट (वैयक्तिक) सन्मानाचे उरण येथील मनोज ठाकूर हे मानकरी ठरले आहेत.

मनोज ठाकूर यांचा एमएसपीसीचे अध्यक्ष अतूल आहिरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन  विशेष गौरव करण्यात आले. याप्रसंगी  अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे , उपाध्यक्ष धनंजय जोशी, सोनाली पडोळे, नितिन मनियार आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Manoj Thakur of Uran was awarded the best medicine salesman!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड