खारघरमधील वारकरी अधिवेशनाला मनोज जरांगे यांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 18:26 IST2024-02-07T18:25:26+5:302024-02-07T18:26:07+5:30
राज्यभरातील वारकरी बांधव या अधिवेशनात हजेरी लावण्यासाठी उपस्थित राहत आहेत.

खारघरमधील वारकरी अधिवेशनाला मनोज जरांगे यांची भेट
पनवेल:खारघर मधील सेंट्रल पार्क मैदानात राष्ट्रीय वारकरी महाअधिवेशनाला दि.7 रोजी मनोज जरांगे यांनी धावती भेट दिली.मराठा समाजाच्या इएम पॉंवर मराठ्यांचे महाकुटुंब आयोजीत मराठा महोत्सवाचे उदघाटनासाठी जरांगे कामोठ्यात आले होते.
2 ते 12 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या महाअधिवेशनाला लाखोंच्या संख्येने वारकरी बांधव खारघर याठिकाणी उपस्थित राहत आहेत. राज्यभरातील वारकरी बांधव या अधिवेशनात हजेरी लावण्यासाठी उपस्थित राहत आहेत. अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमदभगवत महापुराण कथेचे याठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी जरांगे यांचे महाविकास आघाडीचे नेते माजी आमदार बाळाराम पाटील,सुदाम पाटील,बबन पाटील,महादेव शाहबाजकर आदींसह वारकरी संप्रदायाचे वारकरी उपस्थित होते. मनोज जरांगे यांचा उपस्थितांनी स्वागत केले.यावेळी जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधने टाळले.