शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आज माणकेश्वर यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 11:52 PM

उरण परिसरात समुद्रकिनारी आणि निसर्गाच्या कुशीत केगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत माणकेश्वर मंदिर आहे. त्रिपुरारी पौर्णिमेला दरवर्षी वार्षिक यात्रा भरते व तेथे दीपमाळ व मंदिरावर असंख्य दिवे लावून दीपोत्सव साजरा केला जातो.

उरण : उरण परिसरात समुद्रकिनारी आणि निसर्गाच्या कुशीत केगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत माणकेश्वर मंदिर आहे. त्रिपुरारी पौर्णिमेला दरवर्षी वार्षिक यात्रा भरते व तेथे दीपमाळ व मंदिरावर असंख्य दिवे लावून दीपोत्सव साजरा केला जातो. गुरुवारी (२२) येथे माणकेश्वरची यात्रा भरणार आहे.सुमारे ४०० वर्षांपूर्वी केगाव परिसरातील एका शेतकऱ्यास आपल्या (शेल्टी) शेतात शेत नांगरताना नांगराच्या फाळास रक्त लागलेले आढळले. तेव्हा शेतात शोध घेतला असताना त्या शेतकºयास अर्धे तुटलेले शिवलिंग शेतात सापडले. त्यानंतर त्याने केगाव परिसरातील ग्रामस्थ व प्रतिष्ठित लोकांस सदरचा प्रकार सांगून विधिवत पूजाअर्चा करून त्या शिवलिंगाची स्थापना केली. तात्पुरत्या स्वरूपात शिवलिंगावर नारळाच्या झावळ्यांनी छोटेसे मंदिर शाकारले. अर्धवट तुटलेल्या अवस्थेत असलेले एकमेव शिवलिंग माणकेश्वर मंदिरात असून ते राज्यात नव्हे तर देशात एकमात्र असे अर्धवट तुटलेले स्वयंभू शिवलिंग असल्याचे सांगितले जाते. सन १९९९ साली या मंदिराचा जीर्णोध्दार केला.उरण तालुक्यातील उरण शहराच्या पश्चिमेस ४.५ कि.मी. अंतरावर केगाव समुद्र किनारी जेथे अरबी समुद्राचा त्रिवेणी संगम होतो अशा पवित्र ठिकाणी माणकेश्वर मंदिर आहे. श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी उत्सव, त्रिपुरारी पौर्णिमेला वार्षिक यात्रा भरते व तेथे दीपमाळ व मंदिरावर दिवे पेटवून दीपोत्सव साजरा केला जातो. दर्शनासाठी ठाणे, रायगड, मुंबई, नवी मुंबई, वसई, अलिबाग, पेण, मुरुड, पनवेल, अंधेरी, कर्जत, उरण, अलिबाग तालुक्यातून दरवर्षी माणकेश्वर यात्रेच्या निमित्ताने दरवर्षी हजारो शिवभक्त दर्शनासाठी येत असतात. यंदाही गुरुवार (दि.२२) नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमा असल्याने सायंकाळी दीपोत्सव सोहळा साजरा केला जाणार आहे.

टॅग्स :Raigadरायगड