शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

पेणमधील ग्रामपंचायतींवर अवतरणार ‘महिला राज’, तालुक्यातील ६४ गामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2021 8:21 AM

यावेळी झालेल्या सोडत पद्धतीत अनुसूचित जाती महिला राखीव - गागोदे खुर्द, अनुसूचित जमातीमध्ये १४ जागांपैकी ७ जागा महिलांसाठी राखीव तर ७ जागा या प्रवर्गातील खुल्या गटासाठी आहेत.

पेण : तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींच्या सन २०२१ ते २०२५पर्यंतच्या सरपंच पदांसाठीचे आरक्षण सोडत पद्धतीने करण्यात आले आहे. यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थी सुबोध सचिन घरत याच्या हस्ते चिठ्ठी काढून आरक्षण सोडतीचे निकाल जाहीर करण्यात आले.यावेळी झालेल्या सोडत पद्धतीत अनुसूचित जाती महिला राखीव - गागोदे खुर्द, अनुसूचित जमातीमध्ये १४ जागांपैकी ७ जागा महिलांसाठी राखीव तर ७ जागा या प्रवर्गातील खुल्या गटासाठी आहेत. यामध्ये महिला राखीव - सापोली, आंबिवली, आंबेघर, शेडाशी, करंबेली, बोरगाव आणि कोपर तर यामधील खुला गट वरवणे, रोडे, जिणें, कामार्ली, पाटणोली, वाशिवली, शिहू या एकूण १४ जागांचा समावेश आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गात महिलांसाठी राखीव ८ जागांमध्ये काराव, दुष्मी, जोहे, कुहिरे, कासू, महलमिऱ्या डोंगर, दादर, जिते या ग्रामपंचायती असून, या प्रवर्गातील खुल्या गटात खारपाले, सावरसई, निधवली, करोटी, झोतिरपाडा, ङोलवी, कोप्रोली, कांदळे, कोलेटी. सर्वसाधारण गटात महिलांसाठी १६ राखीव जागा आहेत. यामध्ये जावळी, कणे, खरोशी, निगडे, काळेश्री, दीव, बोर्झे, मुढांणी, वारसई, मलेघर, वडखळ, पाबळ, तरणखोप, बेणसे, बळवली, बोरी ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या प्रवर्गात खुल्या गटात दूरशेत, शिक्री, वाकरुळ, रावे, वाशी, मसद बुद्रुक, वरेडी, आमटेम, सोनखार, उंबर्डे, अंतोरे, वरप, हमरापूर, बेलवडे बुद्रुक, वढाव, कळवे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.  यावेळी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदार अरुणा जाधव, नायब तहसीलदार धनंजय कांबळे, नायब तहसीलदार प्रमोद जाधव आदी उपस्थित होते. 

३२ जागांवर महिला  -तालुक्यातील एकूण ६४ ग्रामपंचायतींमध्ये ३२ जागांवर महिला आरक्षण तर ३२ जागा  त्या-त्या प्रवर्गातील खुल्या गटासाठी आहेत. शासनाच्या धोरणानुसार महिलांसाठी ५० टक्के राखीव  जागा सोडतीमध्ये काढण्यात आल्याने पेण तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींवर ‘महिलाराज’ अवतरणार आहे.

टॅग्स :Raigadरायगडsarpanchसरपंचgram panchayatग्राम पंचायत