शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
Pahalgam Terror Attack : 'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
3
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
4
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
5
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
6
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
7
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
8
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
9
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
10
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
11
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
12
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
13
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
14
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
15
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
16
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
17
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
18
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
19
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
20
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार

ग्रामीण सत्ताकेंद्रावरही महाविकास आघाडी, लोणेरे ग्रामपंचायत पुन्हा शिवसेनेकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2021 09:52 IST

जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींची निवडणूक एकत्रित लढण्यात आली. त्यामध्ये महाविकास आघाडाली इतरांपेक्षा घवघवीत यश मिळाले आहे, तर स्वतंत्रपणे लढलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसने १७ ग्रामपंचायींवर निर्विवाद सत्ता स्थापन केली आहे.

रायगड : जिल्ह्यातील ८८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने सर्वाधिक २२ ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्रस्थापित केले. राष्ट्रवादी काॅंग्रेसने १७, शिवसेना १३, शेकाप आणि भाजप प्रत्येकी १२, भाजप-शिवसेना आघाडी ६, विकास पॅनेल ३, काॅंग्रेस २ आणि एक अपक्ष असे राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. विजयी उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळत जल्लाेष साजरा केला. १५ जानेवारी राेजी ७८ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक पार पडली हाेती. तत्पूर्वी १० ग्रामपंचायती बिनविराेध झाल्या हाेत्या. मतमाेजणी सोमवारी सकाळी पार पडली. ग्रामीण भागामध्ये साेयीस्कर राजकारण करण्यात येते. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे.जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींची निवडणूक एकत्रित लढण्यात आली. त्यामध्ये महाविकास आघाडाली इतरांपेक्षा घवघवीत यश मिळाले आहे, तर स्वतंत्रपणे लढलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसने १७ ग्रामपंचायींवर निर्विवाद सत्ता स्थापन केली आहे. शिवसेने १३, तर शेकाप आणि भाजप यांना प्रत्येकी १२ ग्रामपंचायती खिशात घातल्या आहेत. काॅंग्रेसला फक्त दाेनच ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्रस्थापित करता आले आहे. भाजप-शिवसेना आघाडीला ६, स्थानिक विकास पॅनेल ३ आणि एक अपक्ष असे राजकीय समीकरण स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सरपंच पदाचे आरक्षण निकालानंतर काढण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता सर्वांचेच लक्ष आरक्षण साेडतीकडे लागले आहे.

अलिबागमध्ये शेकापची सत्ता -अलिबाग : तालुक्यात ४ ग्रामपंचायतींत झालेल्या निवडणुकीत पेझारी, सासवणे आणि वाघोडे या ३ ग्रामपंचायतींवर शेकापने दणदणीत विजय मिळविला आहे, तर मानतर्फे झिराडमध्ये त्रिशंकू स्थिती आहे. त्यामुळे शेकापने आपला गड शाबूत ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे.तालुक्यातील मानतर्फे झिराड ग्रामपंचायतीमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. येथे शिवसेनेचे ५, शेकापचे ३ आणि काँग्रेसचे ३ उमेदवार निवडून आले, तर दुसरीकडे पेझारीमध्ये ९ पैकी ९ जागांवर दणदणीत विजय मिळवीत शेकापने निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. सासवणे ग्रामपंचायतीच्या ९ जागांसाठी निवडणूक होती. यापैकी प्रभाग १ मधून भाग्यश्री सोमनाथ नाखवा या आधीच बिनविरोध निवडून आल्या आहेत, तर उर्वरित ८ जागांवर शेकापने आपले उमेदवार निवडून आणले आहेत. वाघोडे ग्रामपंचायतीच्या ९ जागांपैकी प्रभाग २ मधील आशिष नरेंद्र म्हात्रे हे बिनविरोध निवडून आले होते, तर उर्वरित ८ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. यापैकी ७ जागांवर शेकापने बाजी मारली असून, उर्वरित २ जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून आले.शेकापचा बालेकिल्ला असलेल्या पेझारी ग्रामपंचायतीमध्ये पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. या ग्रामपंचायतीमध्ये ९ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. या सर्वच्या सर्व जागांवर शेकापने  उमेदवार निवडून आणले. मानतर्फे झिराड ही ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात होती. त्यामुळे शिवसेनेला टक्कर देण्यासाठी शेकापने चांगलाच जोर लावला होता. अपेक्षेप्रमाणे याठिकाणी अटीतटीची लढत झाली आहे.  ११ सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे ५ उमेदवार निवडून आले, तर काँग्रेस आणि शेकापचे प्रत्येकी ३ उमेदवार विजयी झाले. त्यामुळे याठिकाणी त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. शिवसेना विरुद्ध शेकाप अशा लढतीमध्ये काँग्रेसने ३ जागा निवडून आणल्याने सत्तेच्या चाव्या काँग्रेसच्या हातात गेल्या आहेत. लोणेरे ग्रामपंचायत पुन्हा शिवसेनेकडेमाणगाव - लोणेरे ग्रामपंचायतीच्या ११ जागांपैकी १० जागांवर शिवसेनेने आपला भगवा झेंडा फडकवण्याचा विक्रम केला आहे. लोणेरे ग्रामपंचायतीत शिवसेनेचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले असून, शिवसेनेला लोणेरे ग्रामपंचायत आपल्याच ताब्यात ठेवण्यात यश आले आहे. शिवसेना पुरस्कृत समर्थ विकास पॅनलला अभूतपूर्व यश मिळून अकरापैकी दहा उमेदवार विजयी होऊन शिवसैनिकांनी इतिहास घडविला आहे. निकाल हाती येताच लोणेरे नाक्यावर शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांचा आतषबाजीत व मोठ्या जल्लोषात विजयी उमेदवारांचे स्वागत केले. यावेळी आमदार भरत गोगावले यांनी सर्व विजयी उमेदवारांचे स्वागत केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पोशीर ग्रामपंचायतीत परिवर्तन नेरळ - कर्जत तालुक्यातील पोशीर ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन विकास आघाडीने बाजी मारली आहे. ग्रामविकास आघाडी आणि परिवर्तन विकास आघाडी अशी लढत झाली. या लढतीमध्ये परिवर्तन विकास आघाडीचे ६ उमेदवार निवडून आल्याने अखेर पोशीर ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन घडले असून ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोशीर ग्रामपंचायतीमध्ये ११ जागांसाठी २५ उमेदवार रिंगणात होते. यात चार प्रभागांतील ६ उमेदवार परिवर्तन विकास आघाडीचे तर ५ ग्रामविकास आघाडीचे विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे पोशीर ग्रामपंचायतीमध्ये शेतकरी कामगार पक्ष सोडून इतर सर्वच पक्षांचे दोन गट पाहायला मिळाले आणि शेतकरी कामगार पक्षाच्या एकीमुळेच हे परिवर्तन घडल्याचे बोलले जात .

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकRaigadरायगडShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस