शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

उरण मतदारसंघात अखेर परिवर्तनाची लाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 00:10 IST

मनोहर भोईर यांना पराभवाचा धक्का; तिरंगी लढतीत महेश बालदी यांची बाजी

- मधुकर ठाकूरउरण : महायुतीला आव्हान देणाऱ्या भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी अखेर सेनेचे मनोहर भोईर यांना पराभवाची धूळ चारत उरण विधानसभा मतदारसंघात विजयाची पताका फडकावली. अत्यंत चुरशीच्या तिरंगी लढतीकडे तमाम राज्यातील राजकीय पक्षांच्या नेत्यांसह उरणकरांचेही लक्ष लागून राहिले होते. सेनेचे आमदार मनोहर भोईर यांच्या कारभाराला कंटाळून अखेर सूज्ञ मतदारांनीच भोईर यांना पराभवाचा धक्का देऊन मतदारसंघात परिवर्तन घडवले.

भविष्यात देशाची दुसरी आर्थिक राजधानी म्हणून उरण उदयास येत आहे. त्यामुळे या मतदारसंघावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षात जोरदार लढाई सुरू होती. उरणमध्ये तिन्ही उमेदवारांमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी घमासान सुरू होते. परस्परांविरोधात दररोजच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात होत्या. जातीपातीच्या हीन प्रचारामुळे प्रचाराची पातळी अत्यंत खालावली होती. ‘मते मागतो आहे, मुलगी नव्हे’ या बालदी यांच्या वक्तव्यांविरोधात तर शेकाप, सेनेने रान उठविले होते.

जनता, कार्यकर्त्यांना वेळ न देऊ शकणाºया आणि कार्यकर्त्यांची कदर नसलेल्या व जनतेच्या विकासकामांऐवजी ठेकेदारीच्या कामातच अधिक रस दाखविणाºया भोईर यांच्याविरोधात काही नाराज शिवसैनिकच उभे ठाकले होते. पाच वर्षांच्या आमदारकीच्या काळात त्यांनी हितचिंतकांना जवळ केले होते, तर प्रामाणिक कार्यकर्त्यांना त्यांनी दूर केले. मतदारसंघात फारशी लोकोपयोगी कामे केली नसल्याने अखेर प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाचारण करण्याची पाळी आली होती.

मात्र, उद्धव ठाकरे यांची प्रचारसभाही भोईर यांना पराभवापासून वाचवू शकली नाही. तीच स्थिती शेकाप उमेदवार विवेक पाटील यांची झाली आहे. स्वबळावर घुमवला शिटीचा आवाज भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी उरण मतदारसंघात केंद्र, राज्य शासनाच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा मतदारांपर्यंत पोहोचविण्यात यशस्वी ठरले. पक्षातून निष्कासित करण्यात आले असले तरी पुन्हा पक्षात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांनी प्रचारपत्रके, फ्लेक्स यांच्यावरही भाजप नेत्यांचे बिनदिक्कतपणे फोटो लावले.

यासाठी भाजप नेत्यांचा बालदी यांना छुपा पाठिंबा मिळत होता. हे काही लपून राहिलेले नाही. त्याशिवाय जाहीर सभा, कॉर्नर सभांचे शिस्तबद्ध नियोजन आणि त्यासाठी भली मोठी तरुण कार्यकर्त्यांची फौज यांच्या भरघोस पाठिंब्यावर महेश बालदी यांनी बाजी मारली. विशेष म्हणजे, त्यांनी स्वबळावर उरणमध्ये शिटीचा आवाज घुमवला आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019uran-acउरणBJPभाजपाShiv Senaशिवसेना