शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: दहिसरचे पार्सल परत पाठवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 00:22 IST

Maharashtra Election 2019: सुनील तटकरे यांचा विरोधकांवर निशाणा : माणगाव येथे सभा

अलिबाग : लोकसभेच्या निवडणुकी वेळी उद्धव ठाकरेंनी विलेपार्लेवरून पार्सल पाठवले होते, त्यांना सुखरूप मान सन्मानाने रायगडच्या जनतेने मोठ्या मताधिक्याने पराभूत करून परत पाठवले. आता पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीत ठाकरेंनी दहिसरचे पार्सल श्रीवर्धनला पाठवले आहे, त्यांनाही परत पाठवण्याचे काम आम्ही करणार आहोत, असा घणाघाती हल्ला खासदार सुनील तटकरे यांनी शिवसेनेचे उमेदवार विनोद घोसाळकर यांच्यावर चढवला.माणगाव येथे श्रीवर्धन मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेवार अदिती तटकरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत खासदार तटकरे बोलत होते.

ऑनलाइन ऑर्डर करून आलेले पार्सल नेहमी खरे नसते, कधी कधी त्यात दगड पण येतात. असेच पार्सल या वेळी आले आहे, त्यामुळे त्याचा स्वीकार न करता परत पाठवण्याचे काम या निवडणुकीत करायचे आहे, असे आवाहन केले. त्यांनी माणगाव तालुक्यातील लोणशी गणातील होडगाव कोंड, उणेगाव, लोणशी मोहल्ला, साई, मोर्बा, खरवली भागात ग्रामस्थांसह संवाद साधला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार तटकरेंनी आघाडीच्या उमेदवार अदिती तटकरे या येथील स्थानिक आहेत. त्या सहजरीत्या लोकांना भेटण्यासाठी उपलब्ध असतात. जिल्हा परिषद अध्यक्षा म्हणून त्यांनी सर्व धर्माच्या लोकांना सोबत घेत या भागात अनेक विकासकामे केली आहेत, असे सांगितले. या वेळी प्रदेश चिटणीस इकबाल धनसे, तालुकाध्यक्ष सुभाष केकाणे, पं. स. सदस्या अलका केकाणे, राजू मोरे, शेकापचे रमेश मोरे, असलम राऊत, युवकचे संतोष दसावते आदी उपस्थित होते.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसsunil tatkareसुनील तटकरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019dahisar-acदहिसर