शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमध्ये दोन्हीकडे बंडखोरी; नेमका फायदा कुणाला होणार? विद्यमान आमदार वर्चस्व कायम राखणार की मविआ धोबीपछाड देणार?

By राजेश भोस्तेकर | Updated: November 8, 2024 06:26 IST

Maharashtra Assembly Election 2024: रायगड जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघांत सत्ताधारी पक्षांचे आमदार पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, महाविकास आघाडीने त्यांच्यासमोर आव्हान निर्माण केले आहे.

- राजेश भोस्तेकर रायगडरायगड जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघांत सत्ताधारी पक्षांचे आमदार पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, महाविकास आघाडीने त्यांच्यासमोर आव्हान निर्माण केले आहे. पेण, उरण, पनवेलमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी झाली झाली आहे. तर, अलिबाग, कर्जत मतदारसंघात महायुतीत बंडाळी आहे. त्यामुळे विद्यमान आमदार आपले वर्चस्व कायम राखतात की, महाविकास आघाडी त्यांना धोबीपछाड देणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

रायगड जिल्ह्यात अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड, कर्जत, उरण आणि पनवेल हे सात विधानसभा मतदारसंघ आहेत. सातही ठिकाणचे आमदार  सत्ताधारी पक्षांत असून, शिंदेसेना ३, भाजप २, अजित पवार गट १ आणि १ अपक्ष आमदार असून, तो सध्या भाजपमध्ये आहे. त्यामुळे महायुतीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. उद्धवसेनेचे पेण, उरण, कर्जत, पनवेल आणि महाड या मतदारसंघांत उमेदवार रिंगणात उतरले आहेत. शेकापकडून उमेदवारी मिळाल्याचा दावा अलिबाग, पेण, पनवेल आणि उरण या मतदारसंघांतील उमेदवार करत आहेत.  

शेकाप आणि उद्धवसेना यांच्यात समेट झाली असला तरी अलिबाग वगळता पेण, पनवेलमध्ये उद्धवसेनेच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले नाहीत. तर, शेकापने उरणमधून अर्ज मागे  घेतलेला नाही. त्यामुळे या ठिकाणी महाविकास आघाडीत तणाव निर्माण झालेला आहे. 

अलिबागमध्ये बंडखोर अपक्ष उमेदवाराने महायुतीच्या उमेदवारांसमोर आव्हान निर्माण केले आहे. कर्जत मतदारसंघात अपक्ष उमेदवाराने महायुती उमेदवारासमोर आव्हान निर्माण  केलेले आहे.  त्यामुळे महायुती असो वा महाविकास आघाडी दोन्हींमध्ये बंडखोरी झाली असल्याने कोण विजयी होणार आणि कोण चारीमुंड्या चीत होणार हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. 

निवडणुकीतील कळीचे मुद्दे- जिल्ह्यात पाणीप्रश्न गंभीर आहे. पर्यटन जिल्हा अशी ओळख असली तरी येथे हा प्रश्न सोडविण्यासाठी फार प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे नागरिकांत नाराजी आहे.  - पुरेशा आरोग्य सुविधा नाहीत. त्यामुळे अधिक उपचारासाठी रुग्णांना नवी मुंबई, मुंबईत जावे लागते. अपघातग्रस्तांवर उपचारासाठीही आधुनिक रुग्णालये नाहीत. ही येथील शोकांतिका आहे.- जिल्ह्यात औद्योगिकीकरण झाले असले तरी नोकरीसाठी येथील नागरिकांना मुंबई, पुणे या शहरात धाव घ्यावी लागते. पर्यटन, शेतीवर आधारित व्यवसायनिर्मिती करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष झाले आहे.  

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Raigadरायगड