शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

महाड बाजारपेठेवर ऐन गणेशोत्सवात मंदीचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 1:05 AM

यंदा महाड शहरासह संपूर्ण तालुक्यात पुराने हाहाकार माजवला. घरे तसेच दुकानदारांचे या पुराने कंबरडेच मोडले होते.

सिकंदर अनवारे दासगाव : संपूर्ण देशभरात मंदीचे सावट असताना गणपती सणानिमित्त गजबजणाऱ्या महाडमध्येही छोट्या दुकानदारांपासून मोठ्या दुकानदारांपर्यंत सर्वांना मंदीची झळ बसली आहे. सणासुदीच्या दिवसांतही हे सर्व जण हातावर हात ठेवून बसलेले आहेत.देशात जाणवणाºया आर्थिक मंदीचा फटका आता सर्वसामान्य विक्रेत्यांनाही जाणवू लागला आहे. कोकणातील गणेशोत्सवात गणेशोत्सवापूर्वी बाजारपेठा खरेदीसाठी हाउसफुल्ल होत असत. मात्र, या वर्षी चित्र उलटे पाहण्यास मिळाले.

यंदा महाड शहरासह संपूर्ण तालुक्यात पुराने हाहाकार माजवला. घरे तसेच दुकानदारांचे या पुराने कंबरडेच मोडले होते. पुरानंतर काही दिवसांतच गणेशोत्सव हा सण येणार असल्याने पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई या कालावधीत होईल, अशी आस लावून बसलेले छोटे-मोठे दुकानदार तसेच व्यापारी, चांदी-सोन्याचे दुकानदार आणि वाहनांचे शोरूम यांची मोठी निराशा या मंदीमुळे झाली आहे. आज सर्व बाजारपेठेतील परिस्थिती पहिली तर जी गर्दी उत्सव काळात पाहिजे ती नसल्याची खंत व्यापारी, दुकानदारांकडून व्यक्त होत आहे. दुकानदारांनीही पूरपरिस्थितीत झालेल्या नुकसानीमुळे दुकानात सणासुदीसाठी लागणारा माल भरून ठेवला नाही. अगदी गणेशोत्सव तोंडावर असतानाच दुकाने विविध सजावटीच्या, पूजेच्या साहित्याने गजबजू लागली होती. मात्र, पावसाची संततधार आणि मंदीचे सावट यामुळे ऐन गणेशोत्सवात चैनीच्या वस्तू खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली. यामुळे विद्युत उपकरणे, घरगुती उपकरणे, मोबाइल विक्रेते, वाहन विके्रते आदी वस्तू खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे.गणेशोत्सव काळात दागदागिने आणि विशेष करून गणरायाच्या सजावटीसाठी, पूजेसाठी विविध चांदीचे दागिने खरेदी केले जातात. यामध्ये चांदीचा मोदक, चांदीच्या दूर्वा, जास्वंद फूल, उंदीर, पान आदी चांदीच्या वस्तू उपलब्ध आहेत. मात्र, या खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली. त्यातच सोने आणि चांदीचे दरदेखील वाढल्याने चांदीच्या दागिन्यांची मागणी घटली असल्याचे सोने-चांदीचे विक्रेते सांगत आहेत. याप्रमाणेच ऐन सणासुदीच्या काळात वाहन खरेदी करण्याकडे कल असतो. मात्र, या गणेशोत्सव काळात मंदीचे सावट असल्याने वाहन खरेदीही मंदावली आहे. ज्या ठिकाणी गणेशोत्सव काळात दुचाकी आणि चारचाकीची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जायची तेथे या वेळेला एक आणि दोन वाहने बुक झाल्याचे सांगण्यात आले आहे.महाडमधील पूरपरिस्थिती आणि चांदीचे वाढलेले दर त्यातच आर्थिक मंदी यामुळे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. यामुळे नियमित खरेदीवर जवळपास ३० ते ४० टक्के परिणाम झाला आहे. तर गणेशाच्या पूजेसाठी असलेली चांदीच्या दागिन्यांची मागणीही घटली आहे.- उमेश जैन,ज्वेलर्स, महाडपुरानंतर गणेशोत्सव आला. मात्र, अनेक ठिकाणाहून पाहिजे त्या प्रमाणात माल येत नाही. सांगली, कोल्हापूरमधील पुरामुळे या भागातून येणारा कापूर, अगरबत्ती यांचा पुरवठा मंदावला आहे. पूर, त्यानंतर आलेली मंदी आदी कारणामुळे नियोजन करता आले नाही.- भगवती कलाल,अगरबत्ती व्यापारी, महाडगणेशोत्सवात दुचाकींची मागणी होईल, यामुळे कर्ज काढून वाहने मागवली. मात्र, एकही दुचाकी बुक झाली नाही. हीच अवस्था सर्व विक्रेत्यांची झाली आहे. वाहन विक्री आलेल्या किमतीत करण्याची पाळी येऊन ठेपली आहे.- बिपीन ओलीवाला,दुचाकी विक्रे ता

टॅग्स :mahad-acमहाडganpatiगणपती