डिझेल पुरवठ्याअभावी पनवेल बस आगारात कोकणात जाणाऱ्या गाड्या रात्रीपासून उभ्या?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 12:28 IST2018-09-10T12:24:51+5:302018-09-10T12:28:26+5:30
गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या जास्त असते.

डिझेल पुरवठ्याअभावी पनवेल बस आगारात कोकणात जाणाऱ्या गाड्या रात्रीपासून उभ्या?
वैभव गायकर
पनवेल - गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या जास्त असते. चाकरमान्यांची गैरसोय सोय होऊ नये म्हणून एसटीच्या माध्यमातून विशेष गाड्या कोकणात सोडल्या जातात. मात्र रविवारी रात्रीपासून पनवेल बस आगारात कोकणात जाणाऱ्या बसेसना डिझेलचा पुरवठा झाल्या नसल्याने अनेक गाड्या पनवेल बस आगारात उभ्या आहेत.
स्थानिक परिसरात धावणाऱ्या गाड्या सुरळीत सुरू असल्या तरी कोकणात जाणाऱ्या गाड्याची मोठी रांग पनवेल बस आगारात लागून राहिली आहे . रविवारी रात्रीपासून या बसना डिझेलचा पुरवठा होत नसल्याने 30 ते 40 बसेस एकाच ठिकाणी उभ्या होत्या. यामुळे चाकरमान्यांची मोठी गैरसोय झाली. सोमवारी 10.30 च्या सुमारास पनवेल आगारात डिझेल चे टँकर दाखल झाल्याने कोकणात जाणाऱ्या बस सुटण्यास काही प्रमाणात सुरुवात झाली. या प्रकाराबद्दल पनवेल बस आगारातील या परिस्थिती संदर्भात पनवेल आगारातील आगार प्रमुख विलास गावंड यांना विचारणा केली असता त्यांनी डिझेलच्या पुरवठ्या अभावी ही परिस्थिती उद्भवली नसून कुर्ला आगारात पार्किंगची समस्या निर्माण झाल्यामुळे त्या गाड्या पनवेल डेपोमध्ये ठेवण्यात आल्याचे स्पष्ट केले. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार डिझेलच्या पुरवठ्या अभावी ही समस्या उद्भवली असल्याचे स्पष्ट सांगण्यात आले आहे.