शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

स्पर्धेसाठी एसटीला कसावी लागणार कंबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:01 AM

जिल्ह्यातील दळणवळणाचा एकच पर्याय : प्रवाशांना चांगल्या सोयी-सुविधा देण्याचे आव्हान

- आविष्कार देसाई 

अलिबाग : रायगड जिल्ह्याची राजधानी असणारे आणि पर्यटनदृष्ट्या अतिशय झपाट्याने विकसित होत असलेल्या अलिबागला अलीकडेच विशेष महत्त्व प्राप्त होताना दिसत आहे. दळणवळणाच्या प्रगत सुविधांपासून अद्यापही थोडा मागास असणाऱ्या अलिबाग शहराची प्रमुख मदार ही एसटी बसवर राहिलेली आहे. मात्र, याच लालपरीला आज मोठ्या स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रवाशांना चांगल्या सोयीसुविधा देण्याचे आव्हान लालपरीला पेलावे लागणार आहे. अन्यथा, एसटीची घसरत असलेली मोनोपॉली नजीकच्या कालावधीत संपुष्टात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रायगड जिल्ह्यातील प्रवासासाठी सर्वसामान्य जनतेची सेवा करणाºया एसटीची आणि स्थानकांची व्यथा ‘लोकमत’च्या माध्यमातून मांडत आहोत. जिल्ह्यातील दुर्लक्षित एसटी स्थानकांकडे प्रशासनाचे लक्ष कें द्रित करण्यासाठी एक छोटासा प्रयत्न.

अलिबाग हे रायगड जिल्ह्याच्या राजधानीचे शहर आहे. १९६० साली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने लाल डबा म्हणजेच आजची लालपरी बससेवा प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू केली होती. अलिबाग शहरामध्ये १९६२ सालापासून प्रथम एसटी धावायला सुरुवात झाली होती. त्या काळी एसटीचे १६ शेड्युल आणि दिवसाला ३१ फेºया व्हायच्या. अलिबागमधून रेवस, हाशिवरे, रेवदंडा, नागोठणे यासह अन्य ठिकाणी फेºया सुरू होत्या. १९६४ साली धरमतरचा पूल झाल्यावर लालपरीची व्याप्ती वाढली. वडखळ, पेण, पनवेल, मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे अशा ठिकाणी एसटी सुसाट धावत होती. दळणवळणासाठी एसटी हाच एकमेव पर्याय होता. १९७० सालापर्यंत ५० शेड्युल म्हणजे सुमारे १५० फेºया होत होत्या. डिझेलचा दर हा सुमारे सहा रुपये ८० पैसे प्रतिलीटर होता. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या पगारावरही खर्च कमी होत होता. एसटीची मोनोपॉली असल्याने एसटीला तोट्यात जाण्याची चिंता नव्हती. त्या कालावधीत दिवसाला सुमारे ८० हजारांचे उत्पन्न मिळत होते.

१९८५ सालानंतर खºया अर्थाने एसटीशी खासगी वाहनांची स्पर्धा वाढली. एसटीची खºया अर्थाने संक्रमणावस्था सुरू झाली. अलिबाग शहरालगत विविध कंपन्या सुरू झाल्याने शहरीकरणाबरोबर नागरीकरण वाढत गेले. शिक्षणाच्या स्तराबरोबरच राहणीमानाचा स्तरही उचांवत गेला. खासगी वाहनांनी प्रवाशांची ने-आण करण्याची व्यवस्था करताना त्यांना चांगल्या सोयीसुविधा कशा देता येतील यावर भर दिला, त्यामुळे खासगी बसेस (ट्रव्हल्स) मिनीडोर, टॅक्सी सेवा यांचे चांगलेच फावले. एसटी ही सरकारच्या अधिपत्याखाली असल्याने अपेक्षित बदल जलदगतीने होताना अडचणी येत होत्या. त्यामुळे एसटीकडून काही प्रवासी दूर होऊ लागले.

अलिबाग एसटी आगारामध्ये आज सुमारे ८० शेड्युलच्या माध्यमातून सुमारे ३०० फेºया होतात. ४०० च्या आसपास कर्मचारी संख्या आहे. दररोज एसटी सुमारे २४ हजार किलोमीटरचे अंतर पार करत आहे. आजघडीला सुमारे चार ते साडेचार लाख रुपयांचे रोजचे उत्पन्न असल्याचे बोलले जाते. दरम्यान, अलिबागचे आगार व्यवस्थापक सी. एम. देवधर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.अलिबाग आगारात सुविधांची वानवा१अलिबाग आगाराचे स्ट्रक्चर हे १९६२ साली डिझाइन केले होते. ते राज्यातील अन्य ठिकाणीही एकाच पद्धतीचे असल्याचे आजही पाहायला मिळते. अलिबाग आगारामध्ये प्रवाशांना बºयाच असुविधांना सामोरे जावे लागत आहे. एसटी आगारामधील फरशांचे तुकडे झाले आहेत. पाणी पिण्याची सुविधा नाही. स्वच्छतागृहही नियमित स्वच्छ करण्यात येत नसल्याने प्रवाशांना नाक दाबून त्याचा वापर करावा लागत आहे.२आगारातील काही पंखे बंदावस्थेमध्ये आहेत. आगार परिसरामध्ये ठिकठिकाणी कचºयाचे साम्राज्य दिसून येते. आगाराच्या परिसरामध्येच अवैधरीत्या वाहने उभी करण्यात येतात, त्यामुळे प्रवाशांना आगारातून चालणेही मुश्कील होते. शेजारीच पोलिसांची चौकी आहे. तेही याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात.३आगारातून नियोजित वेळेत गाड्या सुटत नसल्याने प्रवाशांना तासन्तास ताटकळत बसावे लागते. महिला, मुले आणि वयोवृद्धांची चांगलीच गैरसोय होते. वातानुकूलित असलेल्या शिवशाही गाड्यांचा तर पत्ताच नसतो. त्या कधीच वेळेवर येत नाहीत आणि वेळेवर सुटतही नाहीत, त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेतआगारातून वेळेवर कधीच गाड्या सुटत नाहीत. मुंबईकडे जाणाºया गाड्यांच्या बाबतीमध्ये सर्रास असे घडते. स्वच्छतागृहाची वाट लागलेली आहे. पंखे नसल्याने उन्हामुळे अंगाची लाहीलाही होते. प्रवाशांना चांगल्या सुविधा दिल्या तर ते त्याचे पैसे मोजायला तयार आहेत.- राजेश माने, प्रवासी

टॅग्स :alibaugअलिबाग