शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

‘कर्नावती’लाही प्रदूषणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 5:14 AM

पनवेल तालुक्यात कासाडी, गाढी या महत्त्वाच्या नद्यांना प्रदूषणाचा विळखा बसला आहे. शहरीकरणामुळे या नद्यांच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचा निष्कर्ष लावला जात आहे.

- वैभव गायकरपनवेल -  पनवेल तालुक्यात कासाडी, गाढी या महत्त्वाच्या नद्यांना प्रदूषणाचा विळखा बसला आहे. शहरीकरणामुळे या नद्यांच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचा निष्कर्ष लावला जात आहे. मात्र ग्रामीण भागातील नद्या देखील प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्या आहेत. कर्नाळा येथून उगम पावणाऱ्या कर्नावती नदीत दिवसेंदिवस प्रदूषण वाढत असल्याने येथील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाकडे तक्रार केली आहे.कर्नाळ्याच्या डोंगर रांगांमधून कर्नावती नदीचा उगम झाला आहे. याठिकाणाहून ही नदी सांगुर्ली ग्रामपंचायत हद्दीतील चिरवत, तुरमाळे, सांगुर्ली या गावानजीक वाहते. या परिसरात गोदाम, कारखान्यांची संख्या वाढत आहे. त्यातून घातक रसायनमिश्रित पाणी नदीत सोडले जाते. त्यामुळे कर्नावती नदी दूषित झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. नदीपात्रात दूषित पाण्याचा साठा वाढल्याने या नदीचे पाणी गुरांना देखील पिण्यास धोकादायक झाले आहे.विशेष म्हणजे या दूषित पाण्यामुळे त्याठिकाणच्या रहिवाशांना उग्र वासाला सामोरे जावे लागत आहे. स्थानिक ग्रामस्थ नीलेश वांगीलकर यांनी यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे लेखी तक्र ार केली आहे. या परिसरात असलेल्या राक्यान कंपनीतून नदीच्या पात्रात दूषित पाणी सोडले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकरणात लक्ष घालून संबंधितावर कारवाई करण्याची विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे. पनवेल तालुक्यातील तळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाचा विषय गंभीर बनत चालला आहे.कासाडी नदी दूषित झाल्यामुळे नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेतली आहे. शहरी भागातील नद्यांची दयनीय अवस्था झाली असून ग्रामीण भागातील नद्या देखील प्रदूषित होत असल्याने ग्रामस्थांमध्ये यासंदर्भात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.जेडब्लूसी कंपनीशी करार करून संबंधित जागा भाडेतत्त्वावर घेतली आहे. आमची सर्व माहिती जेडब्लूसीकडे उपलब्ध असल्याने यासंदर्भात जेडब्लूसी व्यवस्थापनाशी संपर्क साधावा.- रंजित कौर, व्यवस्थापक, राक्यान कंपनीसंबंधित प्रकाराची सविस्तर माहिती घेण्यासाठी त्या परिसराची पाहणी केली जाईल. पाहणी केल्यानंतर यासंदर्भात भाष्य करणे उचित होईल.- संदीप पवार, व्यवस्थापक, जेडब्लूसीग्रामस्थांनी केलेल्यातक्र ारीची शहानिशा केली जाईल. या प्रकारात दोषी आढळलेल्या कारखान्यावर निश्चितच कारवाई करण्यात येईल.- सचिन आडकर,अधिकारी, महाराष्ट्रप्रदूषण नियंत्रण मंडळ

टॅग्स :riverनदीpollutionप्रदूषणRaigadरायगड