करंजा-रेवस बाेट समुद्रात अडकली; २५ प्रवाशी बचावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2020 21:08 IST2020-09-19T21:06:47+5:302020-09-19T21:08:37+5:30
भरती सुरू झाल्यावर बाेट प्रवाशांसह सुखरुप रेवस जेटीवर

करंजा-रेवस बाेट समुद्रात अडकली; २५ प्रवाशी बचावले
रायगड: करंजा-रेवस बाेट आज सायंकाळी ओहाेटीमुळे रेवस बंदरात अडकून पडली. बाेटीमध्ये सुमारे 25 प्रवाशी आणि पाच कर्मचारी असल्याचे बाेलले जाते. समद्रातच बाेट अडकून पडल्याने प्रवाशी भयभीत झाले हाेते. भरती सुरू झाल्यावर बाेट प्रवाशांसह सुखरुप रेवस जेटीवर आली.
करंजा येथून सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास आर.के. फ्लाेर्टींग कंपनीची बाेट असल्याचे पाेलीस सुत्रांनी सांगितले. याबाबतची नाेंद मांडवा सागरी पाेलीस ठाण्यात उशिरापर्यंत झाली नव्हती.