शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
4
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
5
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
6
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
7
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
8
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
9
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
10
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
11
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
12
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
13
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
14
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
15
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
16
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
17
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
18
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
19
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
20
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

जलशक्ती अभियान रायगड जिल्ह्यात यशस्वी, सात तालुक्यांमधील २२ ग्रामपंचायतींमधील जलस्रोत बळकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 02:58 IST

पालघर आणि रायगड हे जलशक्ती अभियानातील महत्त्वाचे जिल्हे आहेत.

अलिबाग : महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन (एमव्हीएसटीएफ) आणि युनिसेफ इंडिया यांनी भारत सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत आयोजित केलेल्या जलशक्ती अभियानाच्या यशाबद्दलचा अहवाल नुकताच जाहीर केला आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यांतील २२ ग्रामपंचायतींतील ५८ महसुली गावांमध्ये हे अभियान राबवून ४६ बांधकामे करून जलस्रोत बळकट करण्यात आले. त्यासाठी दोन लाख ७३ हजार ७०० रु पये खर्च आला. त्याचा लाभ १० हजार ४६४ कुटुंबांना होणार आहे. या माध्यमातून ५९ हजार ३६५ वृक्ष लागवडही केली आहे.पालघर आणि रायगड हे जलशक्ती अभियानातील महत्त्वाचे जिल्हे आहेत. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर, महाड, माणगाव, तळा, श्रीवर्धन, म्हसळा आणि सुधागड या तालुक्यांचा समावेश आहे. सात तालुक्यांतील २२ ग्रामपंचायतींमधील जलस्रोत बळकट करण्यात आले आहेत. त्यासाठी दोन लाख ७३ हजार रुपये खर्च आला आहे. याचा लाभ १० हजार ४६४ कुटुंबांना होणार आहे. केंद्र सरकारने स्वच्छ भारत मिशन पाठोपाठ जलजीवन मिशन हा २०२४ पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्याचा समयबद्ध प्रकल्प सुरू केला आहे. पाणी प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे हा या प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग आहे. केंद्र पातळीवर जलशक्ती मंत्रालय स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने राज्यात जलाशय खोदणे, जलाशयांचे पुनर्भरण आणि विस्तार, प्रक्रि या न होणाऱ्या पाण्याचे व्यवस्थापन तसेच पाणी जमिनीत मुरवून उपलब्ध जलस्रोतांना बळकटी देणे अशा उद्दिष्टांसह ‘जलशक्ती अभियान’ ही पाणीबचतीसाठीची राज्यव्यापी मोहीम सुरू केली आहे.देशातील २५६ जिल्ह्यांमधील १५९२ गटांत पाणी वाचवून उपलब्धता वाढविण्याचे प्रयत्न सुरू केले. प्रसिद्धी मोहीम, शेतकरी, नागरिक यांना संघटित करणे, जलस्रोतांच्या व्यवस्थापनासाठी अवकाश तंत्रज्ञानाचा वापर, सततची देखरेख आणि समन्वय या मार्गांनी अभियान सुरू आहे. पाणी वाचविण्याचे पारंपरिक तंत्रज्ञान पद्धतींचे पुनरुज्जीवन, पाण्याचा पुनर्वापर आणि पुनर्भरण यासाठीच्या पद्धती, पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्याच्या पद्धती, जलसंचयाच्या पद्धती, वनीकरण अशा घटकांचा मोहिमेत भर होता.- जलशक्ती अभियानाच्या निकषानुसार महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांमधील २० गटांची निवड झाली होती.- महाराष्ट्र सरकारने या २० गटांमध्ये मोहीम राबवली; परंतु आपल्या सर्व खात्यांमार्फत तसेच सहयोगी संस्थांमार्फत संपूर्ण राज्यात मोहीम नेली.- देशातील अवर्षण प्रवण गटांपैकी १६ टक्के गट महाराष्ट्रात आहेत. गावांसाठीच्या पाणीपुरवठा योजनांपैकी ९० टक्के योजना भूजल साठ्यांवर अवलंबून आहेत. त्यातील अनेक ठिकाणी भूजलाचा प्रमाणाबाहेर उपसा झालेला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात अभियान चालविणे गरजचे होते.- या मोहिमेचा पहिला टप्पा ८ जुलै २०१९ ते १५ सप्टेंबर २०१९ असा होता. दुसरा टप्पा १ आॅक्टोबर २०१९ ला सुरू होऊन ३० नोव्हेंबर २०१९ ला संपला आहे, असेही युसुफ कबीर यांनी स्पष्ट केले.पिण्यासाठी सुरक्षित असे पाणी घरातच मिळाल्याने सार्वजनिक आरोग्य सुधारतेच; पण मानवी विकास निर्देशांकातही वाढ होते. राज्यातील प्रत्येक व्यक्ती घरोघरी पिण्यासाठी शुद्ध पाणी वर्षभर मिळण्यास मदत होईल.- युसुफ कबीर,युनिसेफ

टॅग्स :Raigadरायगड