कर्जत : कर्जत शहरातील रखडलेली विकासकामे हे येथील लोकप्रतिनिधींचे अपयश नाही काय? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. तसेच येथील नेत्यांनी शहराच्या विकासाऐवजी कुटुंबाचे भले केले, असे बोलले जात असून, या ठिकाणी गुंडगिरी वाढल्याचेही मला माहिती आहे. कर्जत मतदारसंघात खोऱ्याने ओढण्याचे जे सुरू आहे, ते थांबवावे, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.
अजित पवार गट, उद्धवसेना, शेकाप आदी पक्षांच्या कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्यावतीने आयोजित प्रचार सभेत अजित पवार बोलत होते. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, पुंडलिक पाटील, जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, उद्धवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, महिला जिल्हाध्यक्ष उमा मुंढे, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पुष्पा हरिश्चंद्र दगडे व नगरसेवकपदाचे उमेदवार उपस्थित होते.
'सत्ता आल्यास खोपोलीचा बारामतीसारखा विकास करू'
नवी मुंबई विमानतळ खोपोलीपासून जवळ असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर नागरीकरण होणार आहे. त्यामुळे खोपोली नगरपालिकेची सत्ता नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात दिली, तर शहराचा बारामती, पिंपरी-चिंचवडसारखा विकास करून दाखवू, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी रात्री खोपोली येथील प्रचारसभेत दिले.
याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. सुनील पाटील, जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आदी उपस्थित होते.
'मैत्रिपूर्ण लढत असती, तर घारे आमदार असते'
विधानसभा निवडणुकीत सुधाकर घारे अपक्ष म्हणून सामोरे गेले तरी त्यांनी लाखभर मते मिळवली. जर या मतदार संघात पक्षाने त्यांना एबी फॉर्म देऊन येथील लढत मैत्रिपूर्ण केली असती, तर घारे आज आमदार म्हणून आपल्या समोर असते. त्याची कसर नगरपालिका निवडणुकीत भरून काढा, असे आवाहन देखील उपमुख्यमंत्री पवार यांनी याप्रसंगी केले.
Web Summary : Ajit Pawar criticized stalled development in Karjat, questioning local leaders' competence. He alleged prioritizing family over city progress and addressed rising crime. He also promised Baramati-like development for Khopoli if NCP gains power.
Web Summary : अजित पवार ने कर्जत में रुके हुए विकास की आलोचना करते हुए स्थानीय नेताओं की क्षमता पर सवाल उठाया। उन्होंने परिवार को शहर की प्रगति से ऊपर रखने और बढ़ते अपराध को संबोधित करने का आरोप लगाया। उन्होंने राकांपा के सत्ता में आने पर खोपोली के लिए बारामती जैसा विकास का भी वादा किया।