शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

बड्या नेत्यांच्या सभांऐवजी संवादावर उमेदवारांचा भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 1:01 AM

मावळ लोकसभा : झोपडपट्टीबहुल असलेला संमिश्र मतदारसंघ

नारायण बडगुजर 

पिंपरी : मावळ लोकसभेच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. पिंपरी विधानसभा हा राखीव मतदारसंघ आहे. कोणतीही मोठी सभा येथे घेण्याऐवजी उमेदवारांनी थेट संवादावर भर दिला आहे. महायुती, महाआघाडीसह वंचित बहुजन आघाडीकडेही येथील मतदारांचे लक्ष आहे. झोपडपट्टीबहुल असला, तरी प्राधिकरणासह काही भाग नव्याने विकसित झाला असल्याने हा मतदारसंघ संमिश्र आहे. त्यामुळे २००९ मध्ये राष्ट्रवादी, तर २०१४ मध्ये शिवसेनेचा विजय झाला.

पिंपरी विधानसभा मतदारसंघाचा मावळ लोकसभा मतदारसंघात समावेश आहे. महायुतीतर्फे शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर बारणे आणि भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात दिलजमाईसाठी बराच कालावधी गेला. मात्र महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी या काळात राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यानंतर बारणे यांनीही वैयक्तिक गाठीभेटींवर भर दिला. वंचित बहुजन आघाडीबाबतही येथील मतदारांत उत्सुकता आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात सुमारे सहा लाख दलित व मुस्लिम मते आहेत. त्यातील सुमारे दीड लाख मते पिंपरी विधानसभा मतदारसंघात आहेत.युती । प्लस पॉइंट काय आहेत?मतदारसंघात शिवसेनेसह भाजपा आणि आरपीआयनेही (आठवले गट) प्रचारासाठी यंत्रणा कामाला लावली आहे़ मतदारसंघात आमदार शिवसेनेचा आहे. त्यांच्याकडून आणि भाजपा नगरसेवकांकडून कोपरा सभांवर भर देण्यात येत आहे.युती । वीक पॉइंट काय आहेत?मतदारसंघ संमिश्र स्वरूपाचा आहे. त्यातच शिवसेनेचे केवळ चारच नगरसेवक या मतदारसंघात आहेत. त्यामुळे सर्वच स्तरातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान शिवसेनेपुढे आहे. त्यासाठी त्यांची भाजपावर मदार आहे.आघाडी । प्लस पॉइंट काय आहेत?पिंपरी विधासभेतून पहिला आमदार राष्ट्रवादीचा झाला होता. तसेच राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले बडे पदाधिकारी या मतदारसंघात आहेत. त्यांना महाआघाडीने गळ घातली आहे. महाआघाडीचे एकदिलाने काम सुरू आहे.आघाडी । वीक पॉइंट काय आहेत?विधानसभेचा हा मतदारसंघ आरक्षित असल्याने येथे मागासवर्गीय मतदारांची संख्या जास्त आहे. या मतदारांचे वंचित बहुजन आघाडी आणि महाआघाडीमध्ये मोठे विभाजन होऊ शकते. त्याचा फटका महाआघाडीला बसू शकतो.मागच्या दोन लोकसभांमध्ये काय होता निकाल?2009च्या लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेला ५७,२८९, राष्ट्रवादीला ५२,५०१ तर बसपाला ५०३३ मते मिळाली होती. अपक्ष मारुती भापकर यांना ३९५० मते मिळाली होती. ४७८८ मताधिक्य शिवसेनेला होते.2014च्या लोकसभा निवडणुकीत या विधानसभेतून शिवसेनेला ९५,८८९ मते मिळाली होती, तर शेकापला ३८,३५९ मते होती. तिसºया क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादीला २१,०७१ मते मिळाली होती.मागच्या निवडणुकीत २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या गौतम चाबुकस्वार यांनी ५१,०९६ मते मिळवीत राष्ट्रवादीच्या अण्णा बनसोडे (४८,७६१ मते) यांचा पराभव केला होता़

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकmaval-pcमावळMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019