शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
5
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
6
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
7
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
8
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
9
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
10
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
12
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
13
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
14
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा
15
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
16
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
17
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
18
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
19
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

माणगावात रानभाज्यांची आवक वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 2:01 AM

माणगाव तालुक्यात रानभाज्यांची आवक वाढली. स्थानिक आणि पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणावर या रानभाज्यांना पसंती दिली जात आहे.

- गिरीश गोरेगावकरमाणगाव : तालुक्यात रानभाज्यांची आवक वाढली. स्थानिक आणि पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणावर या रानभाज्यांना पसंती दिली जात आहे. मुंबई- गोवा महामार्गालगत आदिवासी महिला मोठ्या प्रमाणावर रानभाज्या विकायला बसलेल्या दिसतात.या रानभाज्यांमध्ये करटोली, शेवलं, अकुर, भारंग, कुलू ( कुवाळा ), रानटी टेरी, गरगटी, आळू, म्हशेळीपान, कुर्डु, कुड्याची शेंग-फुल, शेवग्याची पानं-फुलं, टाकळा, इत्यादी प्रकार सापडतात. भवरीची पानं, याच्या बेसन लावून वड्या करतात. आता हा भाजीचा प्रकार फक्त ऐकण्यापुरता शिल्लक राहिला असल्याचे खेड्यातील जाणकार सांगतात. स्थानिकांसह प्रवासी पर्यटक रानभाज्या घेण्यासाठी गर्दी करत आहेत.या भाज्या पावसाळ्यात मिळत असल्याने त्यांना चांगली मागणी असते. पूर्वी माणगाव तालुक्यात दारोदार घ्या गों भाजी...असा आवाज देऊन आदिवासी विकत असताना दिसत असत. मात्र आता अलीकडे महामार्गावरच आदिवासी महिला रानभाज्या विक्रीसाठी बसलेल्या आढळतात. पावसाळ्यात हे आदिवासी याच व्यवसायातून चार पैसे कमवितात व आपला चरितार्थ चालवितात.1या भाज्या शिजविताना एका विशिष्ट पद्धतीतच त्या बनव्यावा लागतात. यात शेवलाची भाजी बनविताना भोंडग्याचा पाला वापरतात. आणखी एका प्रकारचा पाला वापरला जातो, त्याला नान्याचा पाला असे खेड्यात संबोधतात. हा पाला सुकवतात आणि जसा लागेल तसा वापरतात. मुंबईकर गावाकडे आले की हा पाला घेऊन जातात. यातील प्रत्येक भाजीचे अनेक औषधी उपयोग गावाकडे सांगितले जातात. या भाज्यांची उपलब्धता ही केवळ पावसाळ्यातच असते. त्यामुळे इतर वेळी या भाज्यांची पिके घेता येत नाही.2कुलू कुवाळा हे एक प्रकारचे कोवळे गवतच असते. याची चव कांद्याच्या पातीसारखीच आहे. या भाज्या नुसत्या कांदा, लसुणीवर बनविण्यात येतात. चवीसाठी यात डाळी, बीरड देखील टाकतात आणि फारच थोडे तेल, मीठ वापरावे लागते. अतिशय पौष्टिक, चवदार आणि पचायला हलक्या असतात. भारंग भाजी खाण्यामुळे पोटाचे, पचनसंस्थेचे अनेक विकार बरे होतात असे अनेक जण ठामपणे सांगतात. असे म्हणतात की पावसाळ्यात एकदातरी या भाज्या खाव्यात.

टॅग्स :Raigadरायगड