शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

भातपिकावर रोगाचा प्रादुर्भाव

By admin | Updated: September 3, 2015 23:27 IST

पाऊस सतत विश्रांती घेत असल्याने शेतकरी पाऊस सुरु झाल्यापासून चिंतेत आहे. आता पुन्हा एकदा पावसाने दडी मारली आहे. याचा परिणाम भातपिकावर जाणवू लागला आहे.

कर्जत : पाऊस सतत विश्रांती घेत असल्याने शेतकरी पाऊस सुरु झाल्यापासून चिंतेत आहे. आता पुन्हा एकदा पावसाने दडी मारली आहे. याचा परिणाम भातपिकावर जाणवू लागला आहे. कारण खडकाळ आणि मुरमाड जमिनीमधील पिके पावसाअभावी सुकू लागली आहेत. तसेच भातपिकावर रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी बगळ्या रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागल्याने भाताचे पीक हातात येण्याची शक्यता कमी झाली आहे.कर्जत तालुक्यात सध्या पावसाळ्यात दहा हजार हेक्टर जमिनीमध्ये भाताची शेती करण्यात आली आहे. परंतु पावसाने तीन महिन्याच्या काळात नियमितपणा ठेवला नाही. त्यामुळे शेते कोरडी पडली आहे. यावर्षी जेमतेम १८०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शेतकऱ्यांच्या संकटात भर म्हणून की काय आता शेतातील भात पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसत आहे. कारण भाताचे पीक आता कोंब येण्याचे स्थितीत असताना रोगाचा प्रादुर्भाव सुरु झाला आहे. कळंब , ओलमण, बोरगाव, खांडस आदी भागातील भाताच्या पिकावर सध्या बगळ्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसत आहे. या रोगाची कीड ही कोंबीमध्ये घुसून भाताचा चुड खराब करते आणि नंतर त्याचा फैलाव संपूर्ण शेतात होतो, वातावरणामध्ये जोरात हवा असेल तर त्या किडी आणि कीटक हे बाजूच्या शेतातील भाताच्या पिकाला आपले लक्ष्य करतात. बगळ्या आणि अन्य तत्सम रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकरी वर्गाने कृषी विभागाच्या कृषी सहायकांचा सल्ला घेण्याचे आवाहन कृषीभूषण शेतकरी शेखर भडसावळे यांनी केले आहे. शेत कोरडे पडले तर किडी आणि भुंगे यांना भाताच्या पिकावर हल्ला करण्याची संधी मिळते. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. (वार्ताहर)