शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Pawar पवार कुटुंबात तीन खासदार, दोन आमदार तरी ही घराणेशाही नाही; रोहित पवारांचा तर्क ऐका...
2
राज्य भाजपात मोठे बदल होणार?; दिल्लीत पार पडणार महाराष्ट्रातील बड्या नेत्यांची बैठक
3
वायनाड की रायबरेली? निर्णय घेण्यासाठी राहुल गांधींकडे शेवटचा १ दिवस बाकी, अन्यथा...
4
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
5
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
6
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
7
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
8
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
9
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
10
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान
12
भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या मार्गात 'मोठा' अडथळा; कॅरेबियन बेटांवर महत्त्वाची घडामोड
13
T20 WC 2024: श्रीलंकेचा शेवट गोड, ८३ धावांनी विजय; नेदरलँड्सला पराभवासह निरोप
14
'बोलेंगे भी और लडेंगे भी!' JNU सिनेमाचा ज्वलंत ट्रेलर, सिद्धार्थ बोडकेचा जबरदस्त अभिनय
15
Investment Post Office : ₹१०० ची पॉवर : ५ वर्षांत जमा कराल गॅरंटीड लाखोंचा फंड, समजून घ्या गणित
16
राजामौलींच्या सिनेमातून प्रविण तरडेंची दाक्षिणात्य सिनेसृष्टीत दमदार एन्ट्री; साकारणार खतरनाक खलनायक
17
नागपूरचा डॉली चहावाला सातासमुद्रापार; मालदीवच्या समुद्रकिनारी टपरी, पर्यटकांनी घेतला आस्वाद
18
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
19
MHT CET 2024 Results: पैकीच्या पैकी! रिक्षाचालकाच्या मुलाची उत्तुंग झेप, MHT CET मध्ये १०० पर्सेंटाइल
20
संगमरवरी बांधकाम आणि बरंच काही! अमिताभ बच्चन यांच्या घरातल्या मंदिराचे सुंंदर Inside फोटो बघा

बेरोजगार तरुणांच्या संख्येत वाढ, पाच वर्षांत ४५ हजार २८५ तरुण बेकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 1:53 AM

पाच वर्षांत ४५ हजार २८५ तरु ण बेकार : केवळ दोन हजार ८३५ जणांना मिळाल्या नोकऱ्या

जयंत धुळप 

अलिबाग : रायगड जिल्ह्यात मोठमोठे उद्योग उभारण्यात आले. मात्र, तरीही येथील तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न कायम असल्याचे रायगड जिल्हा कौशल्य विकास व रोजगार कार्यालयाकडे उपलब्ध असलेल्या माहितीवरून स्पष्ट होते. २०१४ ते २०१८ या पाच वर्षांतील युती सरकारच्या कालावधीत एसएससी, बारावी, पदवी आणि उच्च पदवीधर अभियांत्रिकी क्षेत्रातील एकूण ४८ हजार १२० बेरोजगार तरुणांनी रोजगार प्राप्तीकरिता आपली नावनोंदणी केली. केवळ ५.९८ टक्के म्हणजे दोन हजार ८३५ बेरोजगार तरुणांना काम मिळाले. तर तब्बल ४५ हजार २९५ तरु ण अजूनही नोकरीच्या शोधात आहेत.

२०१४ ते २०१८ या पाच वर्षांच्या प्रतिवर्षीचा रोजगार संधीचा विचार केला, तर २०१४ मध्ये म्हणजे युती सरकारच्या कारभाराच्या पहिल्या वर्षी मोठ्या उत्साहात विक्रमी अशा १२ हजार ०८४ बेरोजगार तरुणांनी रायगड जिल्हा कौशल्य विकास व रोजगार कार्यालयाकडे रोजगाराकरिता मोठ्या अपेक्षेने नोंदणी केली; परंतु प्रत्यक्षात १२ हजार ०८४ नोंदणीकृत बेरोजगारापैकी केवळ १.८९ टक्के म्हणजे २२९ तरुणांना रोजगार संधी उपलब्ध होऊ शकली. तर ११ हजार ८५५ बेरोजगार तरुणांचा भ्रमनिरास होऊन, मोठी फौज युती सरकारच्या पहिल्या वर्षी जिल्ह्यात तयार झाली.

युती सरकारच्या दुसऱ्या वर्षी म्हणजे २०१५ मध्ये जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना मेक इन इंडिया या सरकारच्या योजनेवरचा विश्वासच उडाला आणि अनेक बरोजगार तरुणांनी रायगड जिल्हा कौशल्य विकास व रोजगार कार्यालयाकडे पाठच फिरवली. परिणामी, दुसºया वर्षी पहिल्या वर्षीच्या तुलनेत बेरोजगार तरुणांची नोंदणी घसरली आणि निम्म्यावर आली. यावर्षी पाच हजार २५९ बेरोजगार तरुणांनी नोंदणी केली. मात्र, सरकारचे रोजगार देण्याचे प्रमाणही घटले आणि दुसºया वर्षी केवळ ०.६४ टक्के म्हणजे केवळ ३४ बेरोजगारांना सरकार रोजगार उपलब्ध करून देऊ शकले. दुसºया वर्षीदेखील पाच हजार २२५ बेरोजगार तरुणांची फौज तयार झाली.तिसºया वर्षी बेरोजगार तरुण जिल्हा कौशल्य विकास व रोजगार कार्यालयाकडे पाठ फिरवत असल्याचे लक्षात आल्यावर सरकारी प्रसिद्धी माध्यमातून बेरोजगार युवकांना आकर्षित करण्याकरिता जाहिरातींचा सपाटा लावण्यात आला. परिणामी, पुन्हा एकदा सरकारवर विश्वास ठेवण्याची मानसिकता बेरोजगार तरुणांनी केली.

२०१६ मध्ये रायगड जिल्ह्यात १६ हजार २१७ बेरोजगार तरुणांच्या नोंदणीचा प्रतिसाद मिळाला; परंतु रोजगार उपलब्ध करून देण्याकरिता आवश्यक नियोजनात सरकार अपयशी ठरले. रोजगार उपलब्ध करून देण्याचा टक्का वाढवता आला नाही. परिणामी, जिल्ह्यात रोजगाराकरिता नोंदणी केलेल्या १६ हजार २१७ बेरोजगार तरुणांपैकी केवळ २.२३ टक्के म्हणजे अवघ्या ३६३ बेरोजगारांना रोजगार मिळू शकला आणि तिसºया वर्षीदेखील तब्बल १५ हजार ८५४तरु ण बेरोजगार राहिले.२०१७ मध्ये बेरोजगार उमेदवार नोंदणीचा आकडा पुन्हा निम्यावर आला आणि पाच हजार ६०६ बेरोजगार तरुणांची नोंदणी होऊ शकली.सरकारला आली अखेरच्या वर्षी जागच्युती सरकारच्या चौथ्या वर्षी म्हणजे २०१८ मध्ये सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले. त्याच वर्षी करण्यात आलेल्या मतदार गणनेतून रायगड जिल्ह्यात तरुण व नवमतदारांची संख्या विक्रमी वाढत असल्याचे लक्षात आल्यावर, पुन्हा एकदा तरुण आणि नवमतदार बेरोजगार तरुणांची आठवण सरकारला झाली.च्सरकारी माध्यमातून जाहिराती आणि यंत्रणेस टारगेट देऊन यातून निवडणुकांच्या पूर्वीच्या वर्षी २०१८ मध्ये आठ हजार ९५४ बेरोजगार तरुणांची नोंदणी शक्य झाली. रोजगार उपलब्धीचा टक्का २४.३३ टक्के वर नेऊन दोन हजार १७९ तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. मात्र, तरीही सहा हजार ७७५ तरु ण बेरोजगार राहिलेच.२०१७ मध्ये ५,६०६ पैकी ०.५३ टक्के म्हणजे अवघ्या ३० बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकला. यामुळे तरु णांचा पुन्हा भ्रमनिरास झाला. एकं दर आकडेवारीवरून बेरोजगाराची संख्या वाढल्याचे दिसून येते.

टॅग्स :Employeeकर्मचारीjobनोकरी