शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

बंदला शंभर टक्के प्रतिसाद

By admin | Updated: October 15, 2015 01:53 IST

अखिल भारतीय औषध विक्रेते संघटनेने आॅनलाइन फार्मसीच्या विरोधात १४ आॅक्टोबरला एकदिवसीय बंदला पेणमध्ये शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.

पेण : अखिल भारतीय औषध विक्रेते संघटनेने आॅनलाइन फार्मसीच्या विरोधात १४ आॅक्टोबरला एकदिवसीय बंदला पेणमध्ये शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. पेणमधील शहर व ग्रामीण अशी २५ दुकानांचे शटर डाऊन ठेवून पेण मेडिकल फार्मासिस्ट असोसिएशनने उत्स्फूर्त सहभाग घेऊन आॅनलाइन फार्मसीच्या केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध कडकडीत बंद पाळला. सकाळी संघटनेचे अध्यक्ष मितेश शहा यांच्यासह सर्व औषध विक्रेते यांनी एकत्रितपणे अखिल भारतीय औषध विक्री संघटनेने पुकारलेल्या बंदला सशर्त पाठिंबा देवून बंद पाळला. संपूर्ण देशात व राज्यात बेकायदा आॅनलाइन औषध विक्री व्यवसाय सुरू असून याद्वारे नार्कोटिक्स ड्रग्ज, झोपेची औषधे, गर्भपाताच्या गोळ्या, कोडीन सीरप यासारख्या धोकादायक औषधांची विक्री होत असल्याचे संघटनेने प्रशासनाच्या वेळोवेळी निदर्शनास आणून दिले आहे. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करून देशात ई फार्मसी योजना कार्यान्वित करण्याचा शासनाचा मानस असून राज्यातील औषध विक्रेते आंदोलनात्मक भूमिकेत आहेत. त्याचा एक भाग म्हणून १४ आॅक्टोबरला एक दिवसीय बंद पाळण्यात आला आहे, असे अखिल भारतीय संघटनेच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. या अनुषंगाने रायगडातील १२०० हून अधिक दुकानांचे शटर डाऊन झाल्याने रुग्णांना लागणाऱ्या औषधांची विक्री थांबली होती. (वार्ताहर)>आॅनलाईन व्यवसाय पूर्णपणे अवैध असल्याने या व्यापारास बंदी घालावी. डुप्लीकेट औषधांचा शिरकाव, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय अँटीबायोटिक, वेदनाशामक व अन्य प्रकारच्या औषधांना चालना आदी धोकादायक गोष्टीची जाणीव शासनाला करून देत आॅनलाईन फार्मसीचे धोका लक्षात आणून देण्याचा प्रयत्न असल्याचे मत संघटनेच्या सदस्यांनी व्यक्त केले आहे.> बंदसाठी शासनातर्फे सर्व तयारी केली होती. एकाही रुग्णास औषधापासून वंचित ठेवले नाही. आॅनलाइन फार्मसी हा केंद्राचा विषय आहे. याबाबतचा कायदा अजून व्हायचा आहे. मात्र विक्रेत्यांच्या बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही तयारी केली आहे. पनवेलमध्ये औषधांची दुकाने उघडी आहेत असे साळुंखे यांनी भेटीअंती सांगितले. मात्र संघटनेचे विक्रेत्यांनी शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले आहे. - साहेबराव साळुंखे, सहायक आयुक्त, अन्न व औषध विभाग, पेण