शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
4
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
5
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
6
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
7
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
8
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
9
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
10
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
11
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
12
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
13
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
14
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
15
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
16
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
17
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
18
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
19
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
20
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर

Hospital: अखेर रायगडला हाेणार दोन नवी कामगार रुग्णालये

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 08:48 IST

Hospital कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) देशभरात २३ नवीन १०० खाटांची रुग्णालये स्थापन करणार आहेत. यात महाराष्ट्रातील पालघर, सातारा, पेण, जळगाव, चाकण आणि पनवेल येथील सहा रुग्णालयांचा समावेश आहे.

- नारायण जाधवनवी मुंबई : कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) देशभरात २३ नवीन १०० खाटांची रुग्णालये स्थापन करणार आहेत. यात महाराष्ट्रातील पालघर, सातारा, पेण, जळगाव, चाकण आणि पनवेल येथील सहा रुग्णालयांचा समावेश आहे.  पनवेल येथील नियोजित रुग्णालय हे संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी राहणार आहे. त्याद्वारे जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील नोंदणीकृत ३ हजार ६२५ उद्योगांतील पावणेदोन लाखांहून अधिक कामगारांची सोय होणार आहे.

कॅशलेस सुविधेचा लाभ देण्याचा निर्णयनवीन रुग्णालये उभारण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन ज्या भागात ईएसआयसी योजना अंशत: अंमलात आणली आहे किंवा अंमलात आणली जाणार आहे किंवा जेथे ईएसआयसीच्या विद्यमान आरोग्य सुविधा मर्यादित आहेत, अशा सर्व भागातील विमाधारक कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना, आयुष्मान भारत पीएमजेएवाय संलग्नित रुग्णालयांद्वारे कॅशलेस वैद्यकीय सेवांचा लाभ देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

४८ छोटे दवाखाने    या रुग्णालयांशिवाय ६२ ठिकाणी ५ डॉक्टर असलेले दवाखानेही सुरू होणार आहेत. यात महाराष्ट्रात ४८, दिल्लीत १२ आणि हरयाणामध्ये २ दवाखाने सुरू होणार आहेत.     ही रुग्णालये आणि दवाखाने विमाधारक कामगारांना आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना निवासस्थानाच्या जवळच्या परिसरात दर्जेदार वैद्यकीय सेवा देणार आहेत.

गैरसोय दूर होणारमहामुंबई परिसरात राज्य कामगार विमा योजनेची वरळी, कांदिवली, मुलुंड, ठाणे, उल्हासनगर आणि वाशी येथे रुग्णालये आहेत. मात्र, रायगड जिल्ह्यात मोठमोठे उद्योग असूनही रुग्णालय नसल्याने येथील कामगारांना या दूरवरच्या रुग्णालयांमध्ये जावे लागते. यात त्यांचा वेळ, श्रम, पैसा यांचाही अपव्यय होत होता. पेण, पनवेल येथे नवे रुग्णालय मंजूर झाल्याने ती गैरसोय दूर होणार आहे.

२,००० डॉक्टर लवकरच हाेणार सेवेत रूजूईएसआयसीने गेल्या आठ महिन्यांत विविध पदांसाठी ६,४०० रिक्त पदांची जाहिरात काढली आहे. ज्यामध्ये २००० हून अधिक डॉक्टर / शिक्षकांचा समावेश आहे. ही संपूर्ण भरतीप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर देशभरातील कामगारांना चांगले उपचार मिळणार आहेत.

मोठे उद्योग असूनही रुग्णालय नाही    रायगड जिल्ह्यात जेएनपीए बंदरासह पनवेल, तळोजा, रसायनी, महाड, रोहा, पाताळगंगा सारख्या औद्योगिक वसाहती असूनही स्वतंत्र रुग्णालय नाही.    खासगी रुग्णालयांत या कामगारांची सोय केलेली असली तरी त्यांच्याकडून कामगारांना नेहमीच सापत्न वागणूक देण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे स्वतंत्र कामगार विमा रुग्णालयाची कामगारांकडून मागणी होती.    जिल्ह्याच्या १५ तालुक्यांतील नोंदणीकृत उद्योगांत पावणेदोन लाखांहून अधिक कामगार असून त्यांची गैरसोय टाळण्यास मदत होईल, हा यामागील उद्देश होता.    अखेर केंद्र सरकारने रुग्णालयाची मागणी मान्य करून तशी घोषणा रविवारच्या बैठकीत केंद्रीय कामगारमंत्री भूपेंद्र यादव यांनी केली. यामुळे कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलRaigadरायगड