होळी, धुळीवंदनाच्या दिवशी कर्नाळा अभयारण्य दोन दिवस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 19:49 IST2020-03-07T19:49:14+5:302020-03-07T19:49:34+5:30
कर्नाळा अभयारण्यात मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागातील पर्यटक याठिकाणी येत असतात.

होळी, धुळीवंदनाच्या दिवशी कर्नाळा अभयारण्य दोन दिवस बंद
पनवेल: दि.9 ते 10 होळी आणि धुलिवंदनाच्या दिवशी कर्नाळा अभयारण्य बंद ठेवण्याचा निर्णय वनविभागाच्यावतीने घेण्यात आला आहे.
या दोन दिवसात मोठ्या प्रमाणात पर्यटक सुट्ट्ीची मजा लुटण्यासाठी विविध पर्यटन स्थळांना भेटी देत असतात.धुलीवंदनच्या दिवशी काही पर्यटन मद्यपान करून विविध ठिकाणी धिंगाणा घालत असतात.अशावेळी संबंधित ठिकाणावर सुरक्षा व्यवस्था देखील धोक्यात येत असते. कर्नाळा अभयारण्य हे वन्यजीवांच्या दृष्टीने अत्यंत सुरक्षित जागा मानली जाते. विविध प्रकारचे स्वदेशी तसेच विदेशी प्रजातीचे पक्षी याठिकाणी वास्तव्यास असतात.अशावेळी कोणताही अनुचित प्रकार याठिकाणी घडू नये म्हणून प्रशासनामार्फत दोन दिवस याठिकाणी पर्यटकांना बंद घालण्यात आल्याची माहिती कर्नाळा अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी पी चव्हाण यांनी दिली.
कर्नाळा अभयारण्यात मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागातील पर्यटक याठिकाणी येत असतात.त्यामुळे त्यांनी देखील याबाबत नोंद घेण्याचे अवाहन चव्हाण यांनी केले आहे.