शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

प्रामाणिक हेतूला गवसले सहकार्याचे हात , वढाव गावच्या १८१ महिलांचे श्रम झाले कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 02:22 IST

पाणी उपलब्ध करण्यासाठी पेण तालुक्यातील तीव्र जलदुर्भिक्षाच्या खारेपाटातील वढाव गावातील तब्बल १८१ महिला एकत्र आल्या

- जयंत धुळपअलिबाग - पाणी उपलब्ध करण्यासाठी पेण तालुक्यातील तीव्र जलदुर्भिक्षाच्या खारेपाटातील वढाव गावातील तब्बल १८१ महिला एकत्र आल्या आणि त्यांनी आपल्या गावातील तब्बल सहा एकरांचा तलाव खोदून त्यातील गाळ काढण्याचे काम तळपत्या उन्हात सामूहिक श्रमदानातून सुरू केले,तसेच तलावाच्या संरक्षक भिंती बांधण्यासह अन्य कामाकरिता अपेक्षित ३० लाख रुपये उभे करण्याकरिता आपले सोन्याचे दागिने गहाण ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त ‘लोकमत’ने गेल्या शुक्रवारी प्रसिद्ध केले. हेतू प्रामाणिक असेल तर सहकार्याचे हात आपोआपच पुढे येतात आणि समस्येतून मार्ग निघतो, याची प्रचिती वढाव गावच्या या १८१ कष्टकरी महिलांना सोमवारी आली.वढाव गावातील पाण्यासाठी तलावातील गाळ काढण्याकरिता श्रमदान करणाऱ्या गावदेवी ग्राम विकास संस्थेच्या १८१ महिलांना भेटण्याकरिता पेणमधील आई डे केअर गतिमंद मुलांच्या शाळेच्या संचालिका आणि पेण इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा स्वाती मोहिते वढाव गावात आल्या, त्यांनी त्यांना विविध पुरस्काराच्या रूपाने मिळालेल्या रकमेपैकी १० हजार रुपयांची आर्थिक मदत दिल्याचे गावदेवी ग्राम विकास संस्थेच्या अध्यक्षा हेमलता म्हात्रे यांनी सांगितले. दरम्यान, वढाव गावातीलच एक दानशूर सचिन ठाकूर यांनी देखील १० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.स्वाती मोहिते यांनी पेणमधील रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे संचालक राजू पिचिका यांची तत्काळ भेट घेतली. वढाव गावातील महिलांच्या श्रमदानाची संपूर्ण कथा त्यांना सांगून, त्यांचे पोकलेन मशिन तलावाचा गाळ काढण्याकरिता मिळावे, डिझेलचा खर्च त्या महिला करतील, अशी विनंती केली आणि त्यांनी मोहिते यांची विनंती मान्य केली. सोमवारी सकाळीच एका ट्रेलरवरून पिचिका यांच्या पोकलेन मशिनसह स्वाती मोहिते वढाव गावात दाखल झाल्या. पेण येथून वढावमध्ये पोकलेन मशिन आणणे व काम झाल्यावर परत नेण्याचा ५० हजारांचा खर्चही पिचिका यांनीच केला आहे. शिवाय, पोकलन चालकाचा पगारही तेच देणार आहेत.त्यांच्या रूपाने आम्हाला देवच भेटला...आमच्या गावदेवीकडे प्रार्थना करून श्रमदानास सुरुवात करीत होतो आणि देवाने आमचे साकडे मान्य करून स्वाती मोहिते आणि राजू पिचिका यांच्या रूपाने देवच आम्हाला दिसल्याची भावना आम्हा सर्व महिलांची आहे. ज्यांना आम्ही कधीही पाहिलेलेही नाही, ज्यांनी आम्हालाही पाहिलेले नाही, ओळख असण्याचे काही कारणही नाही अशा माणसाने त्यांचे पोकलेन मशिन पूर्णपणे मोफत आम्हाला उपलब्ध करून दिले, अशा परिस्थितीत ते आमच्यासाठी देवापेक्षा आणखी काय असू शकतात, अशी भावना गावदेवी ग्राम विकास संस्थेच्या अध्यक्षा हेमलता म्हात्रे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.सरकारी यंत्रणा मात्र अद्याप सुस्तचआमची ग्रामपंचायत वा अन्य कोणतीही सरकारी यंत्रणा यांच्याकडून अद्याप कोणत्याही प्रकारे आम्हाला मदत मिळालेली नाही. रोजगार हमी योजनेची जॉब कार्ड जरी करून मिळाली तरी आम्हाला रोहयोतून मिळू शकणारी मजुरी आम्ही संरक्षण भिंतींच्या कामासाठी वापरू शकू, अशी अपेक्षा म्हात्रे यांनी अखेरीस व्यक्त केली आहे.जेएसडब्ल्यू कंपनी करणार सहकार्यतलावाच्या नादुरुस्त भिंती पाडून त्यातील दगड वेगळे करण्याचे काम मशिन करणार आहे. यामुळे दगड विकत घेण्यात बचत होईल. वढाव गावकीने एक लाख ८० हजार रुपये या कामासाठी मंजूर करून, त्यातील एक लाख रुपये प्रत्यक्ष दिले आहेत, तर ८० हजार रुपये दुसºया टप्प्यात देणार आहेत. मशिनने काढलेला गाळ वाहून नेण्याकरिता दोन डम्पर भाड्याने घेतले आहेत, त्याकरिता रोज १२ हजार रुपये खर्च आहे. गाळ काढल्यावर तलावाच्या संरक्षण भिंती बांधण्याचे मोठे खर्चिक काम आहे. त्यासाठी काही रक्कम देण्याची तयारी जेएसडब्ल्यू कंपनीने दाखविली आहे, येत्या दोन-तीन दिवसांत त्याबाबत निर्णय होईल, असे म्हात्रे यांनी सांगितले. 

टॅग्स :RaigadरायगडWomenमहिलाWaterपाणी