शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-भाजपा आणि डावे, निवडणुकीत कट्टर विरोधक आले एकत्र, या पक्षाविरोधात केली आघाडी   
2
पुतिन यांच्या भारत भेटीने का खूश झाला आहे पाकिस्तानचा 'हा' शेजारी देश? काय फायदा होणार?
3
कुटुंबाला भेटायला निघालेल्या पोलीस अधिकाऱ्याला वाटेतच मृत्यूनं गाठलं; कार अपघातात पेटली अन् जागीच...
4
बाबरी मशिदीच्या पायाभरणीवरून बंगालमध्ये वाद, विटा घेऊन निघाले हुमायूं कबीर यांचे समर्थक  
5
अनिल अंबानी यांची आणखी १,१२० कोटींची मालमत्ता जप्त; मुदत ठेवी, शेअर्सचाही समावेश
6
SMAT 2025 : डॉक्टरांमुळे इंदूरमध्ये क्रिकेटर्सची गैरसोय! आता पुण्यात रंगणार टी-२० चा थरार; कारण...
7
संबंध नसलेल्यांचे एसआरएवर नियंत्रण, राजकारण्यांना उच्च न्यायालयाचा टोला
8
IndiGo: पाणी नाही, जेवण नाही, कॅप्टनही गायब; इंडिगोच्या प्रवाशानं काढलेला व्हिडीओ एकदा बघाच!
9
Accident: अयोध्येला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात, जळगावची महिला ठार
10
१२ डिसेंबरपासून उघडतोय 'हा' आयपीओ; आतापासूनच ₹३५० च्या नफ्यावर पोहोचलाय GMP
11
एसयूव्ही कार्स खरेदी करण्यासाठी सुवर्णकाळ! 'या' मॉडेल्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट; एकीवर तर ३.२५ लाखांची सूट
12
Dhurandar Box Office: रणवीर सिंगच्या 'धुरंदर'ने पहिल्याच दिवशी धुव्वा उडवला! बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
13
Airfares Soar: मुंबई-पुणे विमानासाठी मोजा ६७,५०० रुपये; अन्य कंपन्यांनी प्रवाशांना प्रचंड लुटले
14
लग्नाचे कायदेशीर वय गाठलेले नसले तरीही ते दोघे स्वेच्छेने लिव्ह-इनमध्ये राहू शकतात; उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल
15
५३१ धावांचं आव्हान, सातव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी, विंडीजकडून जोरदार पाठलाग, अखेरीस असा लागला निकाल  
16
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
17
धक्कादायक माहिती! गुजरातमधील मतदार याद्यांत १७ लाख मृतांची नावे
18
घटस्फोटाच्या ४ महिन्यानंतर मराठमोळ्या अभिनेत्रीने बांधली दुसऱ्यांदा लग्नगाठ, फोटो आला समोर
19
इंडिगोमुळे प्रवासी बेजार, थेट ठोठावलं सुप्रीम कोर्टाचं दार; CJI सूर्य कांत यांच्या घरी गेले याचिकाकर्ते! म्हणाले...
20
Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवचा मोठा पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळताना रचला इतिहास!
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 00:31 IST

रायगड जिल्ह्यात पनवेलमध्ये सर्वाधिक पाऊस : मुरुड तालुक्यातील आगरदांडा बंदरात स्थिरावल्या २०० हून अधिक बोटी

लोकमत न्यूज नेटवर्कमुरुड : हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणेच मुरुड तालुक्यात सतत दोन दिवस पावसाची रिमझिम सुरू असल्याने जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. सतत पाऊस बरसत असल्याने नदी-नाले व विहिरी तुडुंब भरून वाहत आहेत. त्याचप्रमाणे, शेतामध्ये पाणीच पाणी जमा झाले आहे, तर आगरदांडा बंदरावर २००वर बोटी स्थिरावल्या आहेत. काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा जोर पकडल्याने सर्वत्र गारवा निमाण झाला आहे.

मुरुड तालुक्यात पावसाने तीन हजार मिलिमीटरचा टप्पा पार केला असून, आतापर्यंत ३,०८५ मिलीमीटर एवढा पाऊस बरसला आहे. पावसामुळे याचा परिणाम एसटी वाहतुकीवर दिसून आला. पावसामुळे कोणीही प्रवासी प्रवास करणे टाळत आहे. त्याचप्रमाणे, आगरदांडा बंदरात मुरुड तालुक्यसह श्रीवर्धन रत्नागिरी, गुजरात, कर्नाटक आदी भागांतीलही बोटी आढळून येत आहेत. सुमारे २०० हून अधिक बोटींनी येथे आसरा घेतला आहे. खोल समुद्रात जोरदार वारे व तुफान आल्याने आम्ही किनारा गाठला असल्याची माहिती येथील बोट मालकांनी ‘लोकमत’ला दिली.

प्रशासनाकडून थांबलेल्या बोटींची काळजी घेण्यात येत असून, त्यांना आवश्यक असणारा पाणीपुरवठा, त्याचप्रमाणे डिझेल व रेशनिंग सामान पुरविण्याबाबत लक्ष दिले जात आहे. रायगड जिल्हा मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांनी सांगितले की, वातावरणात बदल झाल्याने खोल समुद्रात उंच लाटा व वेगाने वाहणारे वारे, यामुळे मासळी पकडण्यास मोठी समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे मासेमारी करणे कठीण बनले होते. धोका वाटत असल्याने सर्व बोटी आगरदांडा व दिघी बंदर सुरक्षित असल्याने, मुंबई, गुजरात, कर्नाटक आयडी भागातील बोटी या ठिकाणी थांबल्या असल्याचे बैले यांनी सांगितले.

खोल समुद्रात पाऊस व जोरदार वारे झाल्यामुळे बाहेरील बोटींनी सुरक्षित अशा आगरदांडा बंदरात आसरा घेतला आहे. सुमारे दोनशे बोटी किनाºयला स्थिरावल्या आहेत. गुजरात महाराष्ट्र व दमण आदी भागांतील होड्या येथे थांबल्या आहेत. प्रशासनाकडून त्यांची काळजी घेतली जात आहे.-तुषार वाळुंज ,मत्स्य विकास अधिकारी

टॅग्स :Rainपाऊस