शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
5
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
6
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
7
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
8
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
9
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
10
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
11
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
12
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
13
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
14
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
15
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
16
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
17
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
18
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
19
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
20
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  

रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 4:13 AM

रायगड जिल्ह्यातील सागरी किनाऱ्यांना पावसाने सर्वाधिक झोडपून काढले. त्यामध्ये प्रामुख्याने अलिबाग, मुरुड, उरण, श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्याचा समावेश आहे.

अलिबाग - जिल्ह्यातील सागरी किनाऱ्यांना पावसाने सर्वाधिक झोडपून काढले. त्यामध्ये प्रामुख्याने अलिबाग, मुरुड, उरण, श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्याचा समावेश आहे. मागील २४ तासांत तब्बल एक हजार ११२ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत २४२ मिलीमीटर पाऊस अधिक पडला आहे. अलिबाग-कार्लेखिंड आणि मुरुड-बोर्ली येथे झाडे पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. आगामी ४८ तासांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.भारतीय हवामान विभाग आणि स्कायनेट यांनी ९ ते १२ जून या कालावधीत २६ जुलै २००५ एवढा पाऊस पडणार असल्याचा इशारा आधीच दिला आहे. शुक्रवारची रात्र आणि शनिवारचा अखंड दिवस जणू वरुणराजाच्याच नावावर दिला होता. सोसाट्यांच्या वाºयांसह त्यांनी न थकता बरसण्यास सुरुवात केल्याने सर्वांचीच चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने नगर पालिका, ग्रामपंचायतीने नालेसफाईचे केलेले दावे पावसाने खोटे ठरवले. पावसाचा जोर प्रचंड असल्याने नाले दुथडी भरून वाहत होते. दरम्यानच्या कालावधीत समुद्राला भरती आल्याने त्याच नाल्यांच्या माध्यमातून पाणी सखल भागात साठल्याचे दिसून आले.वृक्ष कोसळल्याने वाहतूक ठप्पपावसाला सोसाट्याच्या वाºयाची सोबत असल्याने अलिबाग तालुक्यातील कार्लेखिंड आणि मुरुड तालुक्यातील बोर्ली-मांडला परिसरामध्ये मोठे झाड रस्त्यामध्येच पडले. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली.पावसाचा आनंद घेण्यासाठी अलिबाग आणि मुरुड तालुक्यामध्ये मोठ्या संख्येने पर्यटक आले होते. रस्त्यामध्ये झाड पडल्याने त्यांना वाटेतच अडकून पडावे लागले. संबंधित यंत्रणेने रस्त्यातील झाड बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली.बचाव पथकांना दक्षतेच्या सूचनापुढील ४८ तासांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, कामाशिवाय बाहेर पडू नये, समुद्र किनारी भागात राहणाºया नागरिकांनी दक्ष राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.समुद्र किनारी येणाºया पर्यटकांना समुद्रामध्ये जाण्यापासून मज्जाव करावा. तेथील संबंधित बचाव पथकाने यावर लक्ष द्यावे. नागरिक आणि पर्यटकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.मुरु ड तालुक्यात ४१४ मि.मी.ची नोंदआगरदांडा : मुरु ड तालुक्यातील सर्वच भागात गेले दोन दिवस विजांच्या कडकडासह जोरदार पावसाने हजेरी लागल्याने शेतकरी सुखावले आहेत.आतापर्यंत तालुक्यात ४१४ मिमी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. सोसाट्याच्या वाºयामुळे काही ठिकाणी वृक्ष कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. पावसामुळे वीज प्रवाह खंडित झाल्याने नागरिक प्रचंड त्रस्त आहेत.डोंगराळ भागात दरडींचा धोकाश्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यात शनिवारी रात्रीपासून पावसाने चांगलाच जोर धरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील कोलमांडला आडी रस्त्यावर वृक्ष उन्मळून पडला आहे. त्यामुळे सदर मार्गावर वाहतूक बंद करण्यात आली आहे. एसटीच्या सायंकाळपर्यंतच्या नियोजित फेºया बंद करण्यात आल्या आहे. सदर मार्गावर दैनंदिन वाहतूक तुरळक प्रमाणात सुरू आहे. तालुक्यातील श्रीवर्धन शेखाडी मार्गावरील कोंडविल येथे दरड कोसळण्याचा धोका आहे. कारण पावसामुळे डोंगरावरील दगड व माती रस्त्यावर येण्यास सुरूवात झाली आहे.श्रीवर्धन तालुक्यात अनेक ठिकाणी नियम धाब्यावर बसवून अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. डोंगराळ भागात अनधिकृत बांधकामे वाढल्याने दरडी कोसळण्याचा धोका निर्माण होत आहे.

टॅग्स :RainपाऊसRaigadरायगड