शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दिवेआगार सुवर्ण गणेश दरोडा प्रकरणाची सुनावणी पूर्ण; विशेष न्यायालयात आज निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 13:39 IST

वेआगर सुवर्ण गणेश मंदीर दरोडा आणि खून खटल्याची सुनावणी पुर्ण झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरातील गणेश भक्तांचे लक्ष लागलेल्या या प्रकरणाचा निकाल आज निकाल आहे.

- जयंत धुळप 

अलिबाग- दिवेआगर सुवर्ण गणेश मंदीर दरोडा आणि खून खटल्याची सुनावणी पुर्ण झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरातील गणेश भक्तांचे लक्ष लागलेल्या या प्रकरणाचा निकाल आज निकाल आहे. २४ मार्च २०१२ला ही घटना घडली होती. यात महादेव गोपाळ घडशी आणि अनंत बापू भगत या दोघांचा खुन करण्यात आला होता. तर सुवर्ण गणेशाची १ किलो ३२५ ग्रॅम सोन्याची  प्राचिन मुर्ती व २२५ ग्रॅम वजनाचे अन्य सोन्याचे दागिने असा ११ लाख २० हजार रुपये किमतीचा ऐवज दरोडेखोरांनी लुटून नेला होता..  या प्रकरणी दिघी सागरी पोलीस स्टेशन मध्ये १२ जणांविरुध्द भादवी कलम  ३९६.३९७, १२० ब, २०१, ४१२ आणि महाराष्ट्र राज्य संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा १९९९ अर्थात मोक्काच्या कलम ३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

अलिबाग येथील जिल्हा व सत्र न्यायालयात स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयात याची सुनावणी सुरु होती.  या प्रकरणी तपासी अधिकारी संजय शुक्ला आणि वि वी गायकवाड यांनी ऑक्टोबर २०१२ मध्ये दोषारोपपत्र न्यायालयासमोर दाखल केले होते. तेव्हा पासून या प्रकरणाची सुनावणी सुरु होती. विशेष मोक्का न्यायाधिश के आर पेठकर यांच्या न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीत एकुण १०४ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. यात मंदिर व्यवस्थापन समिती, तपासी अधिकारी, पंच साक्षीदार, वाहन चालक, वैद्यकीय अधिकारी, सिसीटिव्ही तंत्रज्ञ यांच्या आणि स्थानिकांच्या साक्षी महत्वाच्या ठरणार आहेत.

मंदीरातील सिसीटिव्ही कॅमेरयात कैद झालेल्या आरोपींचे शुटींग, त्यांनी वापरलेल्या मोबाईल सिमकार्डचे टॉवर लोकशन यामुळे गुन्ह्याच्या घटनांची मांडणी करण्यात पोलीसांना यश आलेआहे. याशिवाय दरोड्यासाठी वापरण्यात आलेल्या पहारी, चोरीला गेलेली दानपेटी, आरोपींकडून १ किलो २४६ ग्रॅम सोन्याची लगडी हस्तगत करण्यात पोलीसांना आलेले यश महत्वपुर्ण ठरले. या प्रकरणात शासकीय अभिव्योक्ता म्हणून अँड. प्रसाद पाटील यांनी काम पाहिले तर बचाव पक्षातर्फ ९ वकीलांनी आपली बाजू मांडली.

आरोपींची नावे,

१.नवनाथ विक्रम भोसले- घोसपुरी अहमदनगर

२.कैलास विक्रम भोसले- घोसपुरी अहमदनगर

३.छोट्या उर्फ सतीश जैनु काळे- बिलोणी औरंगाबाद

४.आनंद अनिल रायमोकर- बेलंवडी श्रीगोंदा(सोनार)

५.अजित अरुण डहाळे-धारगाव श्रीगोंदा(सोनाराचा सहकारी)

६.विजय उर्फ विज्या बिज्या काळे कोळगाव,अहमदनगरज्

७.ज्ञानेश्वर विक्रम भोसले, मोळवाडी घोसपुरी

८.गणेश विक्रम भोसले- मोळवाडी घोसपुरी

९.खैराबाई विक्रम भोसले, मोळवाडी

१०.विक्रम हरिभाऊ भोसले, मोळवाडी

११.कविता उर्फ कणी राजू काळे, हिरडगाव श्रीगोंदा

१२.सुलभा शांताराम पवार, लोणी

टॅग्स :Courtन्यायालयtheftचोरी