शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

रायगड जिल्ह्यात आरोग्यसेवेचा बोजवारा; रुग्णांच्या आरोग्याची हेळसांड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 23:00 IST

दक्षिण रायगडात सुसज्ज रुग्णालयाची मागणी

उदय कळस म्हसळा : रायगड जिल्ह्यात एकूण १५ तालुके आहेत; परंतु त्या तालुक्यात श्रीवर्धन म्हसळा, तळा, माणगाव, महाड, पोलादपूर, पाली अशा तालुक्यांत केवळ ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, तर प्राथमिक आरोग्यकेंद्र, गावामध्ये आरोग्य उपकेंद्र यांच्या पलीकडे रुग्णांसाठी सुखसोर्इंनी परिपूर्ण असे एकही रु ग्णालय नाही. आरोग्यकेंद्र आहेत त्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. बहुतांश आरोग्यकेंद्रात डॉक्टर आहेत तर कसलीही मशिनरी नाही. काही आरोग्यकेंद्रात उपकरणे आहेत तर त्यातले टेक्निशियन कर्मचारी नाहीत. अशा परिस्थितीत रायगडचा दक्षिण भाग आरोग्याच्या सेवेपासून वंचित असून रुग्णांची उपेक्षा होत आहे.

श्रीवर्धन, म्हसळा, तळा अशा डोंगराळ आणि दुर्गम तालुक्यातील रुग्णांवर वेळीच उपचार होत नाहीत. अशा रुग्णांना पनवेल, मुंबई अशा ठिकाणी हलविण्याशिवाय पर्याय नसतो. एखाद्याचा साधा दुचाकीवरून अपघात झाला तर त्याला माणगावला त्वरित हलवावे लागते. रुग्ण गंभीर असेल तर त्याला अधिक उपचारासाठी अलिबाग किंवा पनवेलला न्यावे लागते. अशातच योग्य उपचार वेळेत न झाल्यास बऱ्याच वेळा रुग्ण दगावल्याची अनेक उदाहरणे समोर आहेत. म्हसळा, तळा तालुक्याची अवस्था अगदी नाजूक आहे. मुंबई-गोवा महामार्गावर अपघातामुळे हजारो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले तर हजारो नागरिक कायमचे जायबंदी झाले. तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय रुग्णालयातील अपुºया व्यवस्थेमुळे अनेकांनी रुग्णालयातच आपले प्राण सोडले तर अनेकांना पुढील उपचारासाठी मुंबईलानेताना रस्त्यातच प्राण गमावावे लागले.

रायगड जिल्ह्णातील रुग्णालयांची अवस्था बिकट आहे, त्यामुळे रायगडमधल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांनी गोरगरीब जनतेच्या हितासाठी एकत्र यावे आणि माणगावसारख्या मध्यवर्ती ठिकाणी एक सुसज्ज असे रु ग्णालय उभारावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आरोग्याच्या दृष्टीने चांगल्या नागरी सुविधा मिळणे हा नागरिकांचा हक्क आहे. आरोग्यविषयक दर्जेदार सुविधांसाठी माणगाव ते महाड दरम्यान सोयी-सुविधांनी सुसज्ज असे रुग्णालय व्हावे, यासाठी माणगाव येथे मुंबई-गोवा महामार्गावर एक दिवसाचे लाक्षणीय उपोषण करण्यात आले होते. प्रसूती दरम्यान काही अडचण आली आणि सीझर करावे लागले तरी यासाठी त्या महिलेला माणगाव अथवा श्रीवर्धनला जावे लागते. अशा परिस्थितीत म्हसळा-माणगावच्या प्रवासामध्ये कित्येक बालकांचा मृत्यू झाला आहे.खासगी रुग्णालयात धावम्हसळा ग्रामीण रुग्णालयात नेमून दिलेले डॉक्टर, कर्मचारी हेदेखील कार्यरत नाहीत. पर्यायाने येथील रुग्णांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात जावे लागते. शासनाच्या निकषानुसार नेमून दिलेली आरोग्यसेवा येथील तिन्ही तालुक्यांमध्ये उपलब्ध होत नाही. तळा ग्रामीण रुग्णालयात २०१४ ला भूमिपूजने झाले; परंतु अद्याप इमारत झालेली नाही. तसेच पाली रुग्णालयाचे २०१४ मध्ये तीन वेळा भूमिपूजन झाले तरीदेखील आजपर्यंत तेथे इमारत उभारलेली नाही. त्यामुळे विराजमान होणाºया नवीन सरकारने कोकणातील नागरिकांसाठी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारावे, अशी मागणी होत आहे.जिल्ह्यातील पनवेल आणि महाड येथे ट्रामा केअर सेंटर आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी नागाठणे येथील जमिनीची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. नागोठणे हे जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने त्या जागेची निवड केली आहे. जमीन मिळाली तर तेथे मल्टिस्पेशालिटी, ट्रामा केअर आणि मॅटिर्निटी असे ५० बेडचे हॉस्पिटल सुरू होऊ शकेल. त्यासाठी सर्व बाजूने प्रयत्न होणे गरजेचे आहे. -डॉ. अजित गवळी, जिल्हाशल्य चिकित्सक, रायगड

टॅग्स :Healthआरोग्य