शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

वाढती रुग्णसंख्या ठरतेय आरोग्य विभागाची डोकेदुखी; आरसीएफ, जेएनपीटीचे रुग्णालय देण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 00:55 IST

जिल्हाभरातील कोरोनाबाधित रुग्णांना अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालय व जिजामाता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे.

- निखिल म्हात्रे अलिबाग : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रायगड जिल्ह्यात सातत्याने वाढत आहे. या रुग्णांच्या उपचाराचा ताण येथील आरोग्य व्यवस्थेवर पडत आहे. अलिबाग शहरातील जिजामाता रुग्णालयात ७० आणि जिल्हा सरकारी रुग्णालयातील विलगीकरण कक्षात २० खाटांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मात्र वाढत्या रुग्णसंख्येमुळे येथील क्षमता संपत चालली आहे. आधीच पनवेल आणि मुंबईतील रुग्णालयांवर ताण पडत असल्याने अलिबाग येथील आरसीएफ आणि उरणमधील जेएनपीटीचे रुग्णालय आरोग्य विभागाने मागितले होते, परंतु त्यांनी नकार दिल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्हाभरातील कोरोनाबाधित रुग्णांना अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालय व जिजामाता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. त्यामुळे आता जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना खाटांची कमतरता भासणार आहे. सध्या रुग्णालयात ९० खाटांची सोय असून ती अपुरी पडणार आहे. याचा ताण जिल्हा आरोग्य यंत्रणेवर पडत आहे.

कोरोनाबाधित असलेले सुमारे ७० रुग्ण अलिबाग शहरातील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. यापैकी ६० रुग्ण हे जिजामाता रुग्णालयात तर २० रुग्ण जिल्हा सामान्य रुगालयात उपचार घेत आहेत. मात्र दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्याने रुग्णांना उत्तम आरोग्यसेवा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या १५ तालुक्यांच्या विविध भागांतून उपचासाठी रुग्ण दाखल करण्यासाठी येत आहेत. अलिबाग, उरण, माणगाव, पेण, मुरुड, श्रीवर्धन या ठिकाणांहून ९० रुग्ण उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत. दरम्यान, अलिबागमध्ये रुग्णसंख्या वाढत जाणार असल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

अद्ययावत रुग्णालयासाठी प्रशासनाचे प्रयत्न

1. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने येणाºया नव्या रुग्णांसाठी अद्ययावत रुग्णालय मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

2. अलिबाग येथील आरसीएफ आणि उरणमधील जेएनपीटीचे रुग्णालय आरोग्य विभागाने कोरोना बाधितांच्या उपचारासाठी मागितले होते; परंतु त्यांनी देण्यास नकार दिला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांनी ‘लोकमत’ला दिली.

3. आरसीएफ आणि जेएनपीटी रुग्णालयात नियमित रुग्ण आहेत. त्यामुळे येणाºया नवीन रुग्णांना उपचारासाठी कुठे दाखल करणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केल्याकडे डॉ. गवई यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Raigadरायगडcorona virusकोरोना वायरस बातम्या