शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

पोलादपूर तालुक्यामध्ये भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:52 IST

पुरवठा विभागाकडून ४५ प्रस्ताव मंजूर; १० गावे, ३५ वाड्यांना चार टँकरने पाणीपुरवठा

- प्रकाश कदम पोलादपूर : रायगड जिल्ह्यात पाणीटंचाईने डोके वर काढण्यास सुरु वात केली आहे. पाणीटंचाईची भीषणता वाढल्याने पोलादपूर तालुक्यातील दहा गावे आणि ३५ वाड्यांना टंचाईची झळ बसत असल्याने नागरिकांची तहान भागवण्यासाठी उपाययोजना म्हणून प्रशासनाने चार टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. एकूण ६५ वाड्या व गावे यांचे प्रस्ताव पोलादपूर पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाकडे आले असून, ४५ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. चार टँकरने सुरळीत पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाकडून प्राप्त झाली आहे.तापमान वाढल्याने तालुक्यातील नदीपात्र कोरडे झाले आहेत. ढवळी, कामथी, घोडवळी, सावित्री या मुख्य नद्या पावसाच्या हंगामात दुथडी भरून वाहत असतात, तर उन्हाळ्यात नद्यांची पात्र ओस पडत असल्याने, त्याचप्रमाणे साठवण टाक्या, कूपनलिका याची अवस्था असून नसल्यासारखी झाल्याने तालुक्यातील महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने पाऊस पडतो. मात्र, पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने सर्व पाणी समुद्राला जाऊन मिळते. जिल्ह्यात मोठी धरणे निर्माण करण्यात सरकार आणि प्रशासनाला अपयश आले आहे. त्याचप्रमाणे अस्तित्वात असलेल्या धरणांची योग्य ती डागडुजी करण्यात न आल्यानेही पाण्याची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे प्रलंबित धरणाचा प्रश्न मार्गी लागणे गरजेचे आहे.टंचाईग्रस्त गाव-वाड्याचांभारगणी बु., ओंबळी तामसडे, गोळेगणी गावठाण, तुटवली, साडेकोंड, किनेश्वर गावठाण, कुंभळवने, कालवलीतील कापडे खुर्द राखेचाकोंड, परसुळे, किनेश्वरवाडी, ओंबळी धनगरवाडी, कुडपण शेलारवाडी आदींचा सामावेश आहे.महामार्गालगतच्या गावांमध्ये पाणीटंचाईमुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण कामात काही विहिरी बाधित झाल्या असल्याने, त्याच विहिरींचे पुनर्वसन गावाजवळ किंवा मुख्य विहिरीच्या आसपास करणे गरजेचे आहे. महाड तालुक्यातील महामार्गालगत वसलेल्या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, त्याचप्रमाणे किल्ले रायगडच्या पायथाशी असलेल्या गावांना पाणीटंचाई भासत असून, महिलांसह ग्रामस्थ दूरवरून पाणी आणत असल्याचे चित्र दिसत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई