शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

गोविंदा सज्ज

By admin | Updated: September 5, 2015 23:05 IST

जिल्ह्यात यंदा एकूण ८ हजार ५८७ दहीहंड्या उभारण्यात येणार असून त्यात २ हजार २३३ सार्वजनिक तर ६ हजार ३५४ खासगी दहीहंड्यांचा समावेश आहे. दहीहंडीचा सण साजरा करण्यासाठी

अलिबाग : जिल्ह्यात यंदा एकूण ८ हजार ५८७ दहीहंड्या उभारण्यात येणार असून त्यात २ हजार २३३ सार्वजनिक तर ६ हजार ३५४ खासगी दहीहंड्यांचा समावेश आहे. दहीहंडीचा सण साजरा करण्यासाठी जिल्ह्यातील गोविंदा सज्ज झाले आहेत.दहिहंडी उत्सावात जिल्ह्यात कोठेही अनूचित प्रकार घडू नये, या करिता जिल्ह्यात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला. जिल्हा पोलीस दलास सहकार्य करण्याकरिता शीघ्र कृती दलाची कुमक सज्ज ठेवण्यात आली आहे. कृष्णजन्माष्टमीच्या निमीत्ताने जिल्ह्यातील विविध श्रीकृष्ण मढात पांरपरिक कृष्णजन्म सोहोळ््याचे आयोजन करण्यात आले असून ४८ ठिकाणी मिरवणुका काढण्यात येणार आहेत. निजामपूरमधील योगेश निजामकर उपसरपंच यांच्यावतीने ७७ हजार ७७७ रुपयांची दहीहंडी उभारण्यात येणार आहे. कर्जतमधील वसंतशेठ भोईर मित्रमंडळ यांच्यावतीने पोलीस मैदान कर्जत येथे ५१ हजार रुपयांची दहीहंडी उभारण्यात येणार आहे. मुद्रे खुर्द येथील सागर गोविंद मित्रमंडळाच्या वतीने फायर ब्रिगेड कर्जत येथे ५१ हजार रुपयांची दहीहंडी उभारण्यात येणार आहे. दरम्यान शेतकरी कामगार पक्ष व प्रशांत नाईक मित्रमंडळ अलिबाग यांच्या वतीने साजरा होणारा दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम या वर्षी रद्द करण्यात आला आहे. महाड येथील लोकविकास सामाजिक संस्थेच्या वतीने १ लाख २५ हजार रुपयांची दहीहंडी उभारण्यात येणार आहे. रोह्यात अवधूत तटकरे मित्रमंडळाच्यावतीने डॉ.सी.डी.० देशमुख सभागृहासमोरील मैदानात एक लाख ११ हजार १११ रुपयांची दहीहंडी उभारण्यात येणार आहे. खोपोली येथील शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने एक लाख रुपयांची दहीहंडी शास्त्रीनगर येथे उभारण्यात येणार आहे. बोर्लीपंचतन येथील प्रमोद तुकाराम विचारे चिजवादेवी ट्रस्टच्यावतीने बोर्लीपंचतन एसटी स्टँडमध्ये एक लाख रुपयांची दहीहंडी उभारण्यात येणार आहे.