शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

रायगड हॉस्पिटलमधील क्षमता वाढविण्यावर सरकारचा भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 00:11 IST

आदिती तटकरे यांची माहिती : कोविडसाठी शासनाचे २१० बेड असणार

लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : तालुक्यात असलेल्या कोविड हॉस्पिटलची क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा शासन उपलब्ध करून देईल. ४०० बेडपैकी शासनाच्या ताब्यात २१० बेड राहणार असून, ते सर्व बेड आॅक्सिजन पुरवठा करणारे असतील आणि १० बेड हे व्हेंटिलेटरसह तयार असतील, असे आश्वासन रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी रायगड हॉस्पिटलमधील कोविड रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर दिले.

कर्जत तालुक्यातील डिकसळ येथे असलेल्या रायगड हॉस्पिटलमधील कोविड रुग्णालयाची पाहणी रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी केली. सुरुवातीला रायगड हॉस्पिटलमधील शासनाच्या आणि खासगी तत्त्वावर चालविण्यात येणाऱ्या वॉर्डाची पाहणी केली. यावेळी रायगड हॉस्पिटलमधील सर्व सुविधेची माहिती डॉ.नंदकुमार तासगावकर यांनी दिली. त्यानंतर, तुमचा प्रस्ताव आल्यावर तत्काळ शासनाकडे दिला जाईल, असे पालकमंत्र्याकडून सांगण्यात आले.

रायगड हॉस्पिटलची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना पालकमंत्री अदिती तटकरे यांनी रायगड हॉस्पिटलमधील कोविड हॉस्पिटल सुरू आहे, पण ते अधिक क्षमतेने रायगड जिल्ह्यातील कोविड रुग्णांसाठी जिल्ह्यातील प्रमुख कोविड हॉस्पिटल बनविण्याचा शासनाचा प्रयत्न राहील. येथे मोठी इमारत आहे आणि ४०० बेडची व्यवस्थाही आहे. त्यामुळे त्यातील २०० बेड हे आॅक्सिजनसह तयार केले जात आहेत. मात्र, केवळ आॅक्सिजनचा पुरवठा करून शासन थांबणार नाही, तर रायगड हॉस्पिटलमध्ये आम्ही १० बेड हे व्हेंटिलेटरसह तयार ठेवणार आहोत. त्यामुळे शासनाकडे तेथे एका वेळी २१० बेड हे कोविड रुग्णांसाठी उपलब्ध असतील. त्यासाठी आता रायगड हॉस्पिटलमध्ये पाच व्हेंटिलेटर असून, शासनाकडून आणखी पाचव्हेंटिलेटर पुरविले जातील, अशी माहिती पालकमंत्री तटकरे यांनी दिली.

यावेळी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार सुरेश लाड, रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे, माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, कर्जत पंचायत समितीच्या सभापती सुजाता मनवे, कर्जतच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, जिल्हा परिषदेचे माजी सभापती उत्तम कोळंबे, अशोक भोपतराव, कर्जत माजी सभापती तानाजी चव्हाण, प्रदीप ठाकरे, कर्जत नगरपालिका विरोधी पक्षनेते शरद लाड आदी, तसेच कर्जतच्या प्रांत अधिकारी वैशाली परदेशी, तहसीलदार विक्रम देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सी. के. मोरे, पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर आदी मान्यवर उपस्थितहोते.

पालकमंत्र्यांच्या दौºयात राष्ट्रवादी-सेना एकत्रमुंबईत शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात दिलजमाई झाल्याचे बोलले जात आहे. त्याचा प्रत्यय सोमवारी कर्जत येथील पालकमंत्री दौºयात आला. कर्जत तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते दौºयात एकत्र होते.४०० बेडची व्यवस्थाच्४०० पैकी उर्वरित १९० बेड हे जे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत, पण कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत, अशा रुग्णांसाठी असणार आहेत.च्त्यात जिल्ह्यात पूर्वी पनवेल उपजिल्हा रुग्णालय आणि एमजीएम, तसेच जिल्हा रुग्णालय अशा तीन ठिकाणी कोविडच्या रुग्णांवर उपचार केले जात होते, पण आता अनेक ठिकाणी कोविड रुग्णालये उभी राहत आहेत.च् मात्र, रायगड हॉस्पिटलची क्षमता लक्षात घेता, हे रुग्णालय केवळ कर्जत नाही, तर खालापूर, उरण या तालुक्यातील रुग्णांसाठी हे कोविड हॉस्पिटल असणार आहे, असेही पालकमंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.