Give opportunity to those who have passed the 8th Examination in Agriculture course | कृषी अभ्यासक्र मात १२ वी फेरपरीक्षा पास झालेल्यांना संधी द्या
कृषी अभ्यासक्र मात १२ वी फेरपरीक्षा पास झालेल्यांना संधी द्या

अलिबाग : जुलैमध्ये झालेल्या बारावीच्या फेरपरीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कृषी विद्यापीठाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये आॅनलाइन पद्धतीने प्रवेशाची संधी देण्याची मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव एकनाथ डवले यांच्याकडे केली आहे.

राज्य सरकारच्या उच्च तंत्रशिक्षण विभागांतर्गत अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली. त्याच धर्तीवर कृषी विभागांतर्गत व्यावसायिक अभ्यासक्र मांसाठी विद्यार्थ्यांना मुदतवाढ द्यावी, असा आग्रह आमदार निरंजन डावखरे यांनी धरला आहे. त्यावर अप्पर मुख्य सचिव डवले यांनी सकारात्मक भूमिका दर्शविली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात बारावीच्या जुलैमध्ये घेण्यात आलेल्या फेरपरीक्षांचा २३ आॅगस्ट रोजी निकाल लागला आहे. मात्र, कृषी विद्यापीठांतर्गत प्रवेशप्रक्रि येची मुदत तत्पूर्वीच संपुष्टात आल्यामुळे राज्यात हजारो विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्ज दाखल करता आले नाहीत. त्यामुळे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची भीती असल्याकडे आमदार डावखरे यांनी लक्ष वेधले.
राज्यात अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्र मासाठी प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांना २६ आॅगस्ट २०१९ च्या परिपत्रकान्वये शिल्लक राहिलेल्या जागांवर प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच धर्तीवर कृषी विभागांतर्गत व्यावसायिक अभ्यासक्र मांमध्ये रिक्त झालेल्या जागांवर फेरपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घ्यावा. या संदर्भात पुणे येथील महाराष्ट्र कौन्सिल आॅफ अ‍ॅग्रिकल्चर एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च
संस्थेला आदेश देण्यात यावेत,
अशी मागणी आमदार डावखरे यांनी केली.
कृषी विभागात करिअर करण्याची इच्छा असलेल्या फेरपरीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाल्यास त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही, असेही डावखरे यांनी स्पष्ट केले.

अर्ज करता आले नाहीत
च्राज्यात बारावीच्या जुलैमध्ये घेण्यात आलेल्या फेरपरीक्षांचा २३ आॅगस्ट रोजी निकाल लागला आहे. मात्र, कृषी विद्यापीठांतर्गत प्रवेशप्रक्रि येची मुदत तत्पूर्वीच संपुष्टात आल्यामुळे राज्यात हजारो विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्ज दाखल करता आले नाहीत.
 

Web Title: Give opportunity to those who have passed the 8th Examination in Agriculture course

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.