नेव्ही डे निमित्ताने गेटवे -एलिफंटा पर्यटन वाहतूक बंद राहणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 19:58 IST2023-12-11T19:58:25+5:302023-12-11T19:58:45+5:30
१३ डिसेंबरच्या दुपारपासून १४ पर्यंत दीड दिवस ही वाहतूक बंद राहणार आहे.

नेव्ही डे निमित्ताने गेटवे -एलिफंटा पर्यटन वाहतूक बंद राहणार
उरण : नेव्ही डे निमित्ताने समुद्रात नौदलाची प्रात्यक्षिके होत असल्याने ११ ते १४ डिसेंबर दरम्यान गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा या जलमार्गावरील खासगी पर्यटक वाहतूक १३ डिसेंबरच्या दुपारपासून ते १४ डिसेंबर संपूर्ण दिवसभर जलवाहतूक दीड दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.तर जेएनपीए ते गेटवे ऑफ इंडिया बंदरातून होणारी प्रवासी वाहतूक १४ डिसेंबरपर्यंत भाऊचा धक्का येथून होणार आहे.
११ ते १४ डिसेंबर असे चार दिवस नेव्ही डे साजरा करण्यात येत आहे. त्यासाठी नौदलाच्या प्रात्यक्षिक दरम्यानच्या काळात गेटवे ऑफ इंडिया नजीकच्या समुद्रातील जलवाहतूक काही काळ बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा या सागरी मार्गावरील पर्यटक वाहतूक १३ डिसेंबरच्या दुपारपासून ते १४ डिसेंबर संपूर्ण दिवसभर जलवाहतूक दीड दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुंबई जलवाहतूक संस्थेचे सचिव मामुमुल्ला यांनी दिली. तर गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीए बंदरातून होणारी प्रवासी वाहतूक चार दिवस भाऊचा धक्का येथुनच होणार असल्याची माहिती जेएनपीएचे डेप्युटी कंन्झुवेटर कॅप्टन बाळासाहेब पवार यांनी दिली.