शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
2
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
3
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
4
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
5
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
6
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
7
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
8
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
9
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
10
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
11
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
12
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
13
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
14
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
15
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
16
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
17
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
18
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
19
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील गावांमध्ये परिवर्तनाची गंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 00:47 IST

राज्यातील २२ जिल्ह्यांमधील ७५० गावांमध्ये महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशनच्या माध्यमातून प्रथमच राज्य शासन आणि कॉर्पोरेट संस्थांच्या एकत्रित प्रयत्नातून राबविण्यात येत असलेल्या ग्रामपरिवर्तन उपक्रमास चांगला प्रतिसाद लाभला

- जयंत धुळप अलिबाग : राज्यातील २२ जिल्ह्यांमधील ७५० गावांमध्ये महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशनच्या माध्यमातून प्रथमच राज्य शासन आणि कॉर्पोरेट संस्थांच्या एकत्रित प्रयत्नातून राबविण्यात येत असलेल्या ग्रामपरिवर्तन उपक्रमास चांगला प्रतिसाद लाभला असून कृषी, पाणीपुरवठा, स्वच्छता यासाठीच्या योजनांमध्ये लोकसहभागवाढी सोबतच ग्रामीण विकासासाठी एकत्र येऊन गावात स्थित्यंतर आणले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले आहे.बुधवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे फाउंडेशनच्या नियामक परिषदेची चौथी बैठक झाली. या वेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसायमंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा, कॉर्पोरेट क्षेत्रातील दीपक पारेख, किशोर बियाणी, रोनी स्कूवाला, जागतिक बँकेचे भारतातील प्रमुख जुनेद अहमद आदी मान्यवर उपस्थित होते.शासन आणि खासगी संस्था एकत्र आल्यास कशाप्रकारे ग्रामीण भागाचा विकास होऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण या माध्यमातून पाहायला मिळते. फाउंडेशनच्या माध्यमातून ३८५ ग्रामपरिवर्तकांनी राज्यातील २२ जिल्ह्यांतील ७५० गावांमध्ये विकासाचे काम नेण्यासाठी मोलाची मदत केली आहे. ७५० गावांच्या परिवर्तनापासून सुरू झालेला हा प्रवास १० हजार गावांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्याकरिता या वेळी मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छादिल्या.>२२ गावांसाठी ६५ कोटींचा आराखडा मंजूररायगड जिल्ह्यात सन २०१८-१९ मध्ये २२ गावांसाठी ६५ कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला असून, विविध विकासाची कामे प्रत्यक्ष सुरू आहेत. या योजने अंतर्गत बचतगटातील महिलांना प्रशिक्षण देऊन एलईडी बल्ब निर्मिती व्यवसाय कार्यान्वित करण्यात आला आहे. भाजीपाला उत्पादकांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्यात आले असून, येत्या काळात शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात येणार आहेत. ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा बदलत आहे. स्वच्छता, सर्वांना घरे, पाणीपुरवठा या क्षेत्रात राज्य शासनाचे काम चांगले असून, फाउंडेशनच्या माध्यमातून होत असलेले स्थित्यंतर अभिनंदनीय असून त्यात सातत्य ठेवावे, अशी अपेक्षा ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी या वेळी व्यक्त केली.स्वयंरोजगारासाठी पेपर डिश बनविणे, अशा प्रकारच्या व्यवसायांना प्रोत्साहन व बेरोजगार युवकांना साहाय्य करण्यात येत आहे. कौशल्य वृद्धी करून रोजगार उपलब्ध करून देण्यावर अधिक भर देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.>रायगड जिल्हा आघाडीवरफाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामाचे सादरीकरण रायगड, यवतमाळ, वर्धा, अमरावती, गडचिरोली येथील जिल्हाधिकाऱ्यांनी केले. रायगड जिल्ह्यातील २२ ग्रामपंचायतींच्या हद्दीतील ५५ गावांत झालेल्या परिवर्तनाचे सादरीकरण रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले.या कामात रायगड जिल्हा आघाडीवर असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सादरीकरणाची विशेष प्रशंसा केली. रायगड जिल्ह्यातील या ५५ गावांमध्ये मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक नेमण्यात आले असून, ग्रामविकास आराखडा तयार करण्यात आलेला आहे.रायगड जिल्ह्यात स्वदेस फाउंडेशन ही संस्था प्रमुख विकास भागीदार म्हणून काम करीत असून, ग्रामविकास आराखड्यातील कामे पूर्ण करण्यासाठी ग्रामविकास परिवर्तन कार्यालय मुंबई, शासकीय कार्यालयातील कृतिसंगम अनुदान, जिल्हा नियोजन समिती व स्वदेस फाउंडेशनमार्फत अनुदान उपलब्ध करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.