शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

चवदार तळे शताब्दी वर्षात भेदभावमुक्ती...; महाडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 10:49 IST

डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी...

महाड : महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समतेचा, सामाजिक न्यायाचा आणि संविधानिक मूल्यांचा पुनरुच्चार करत भेदभावमुक्त समाज घडविण्याचा निर्धार व्यक्त केला.    

बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेला हा सत्याग्रह केवळ पाण्यासाठी नव्हता, तर मानवतेच्या प्रतिष्ठेसाठीचा लढा होता, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला चवदार तळ्याच्या ठिकाणी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करून मानवंदना देण्यात आली.

चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाची सुरुवात आज देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आली. चवदार तळ्याचे  जलशुद्धीकरण आणि परिसराच्या सुशोभिकरणासाठी ५५ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामांचे भूमिपूजनही  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.

बुद्धगया येथे महाराष्ट्र भवन मुख्यमंत्री फडणवीस यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीला दिलेला निधी, चैत्यभूमीवरील स्मारकाचे काम, तसेच लंडन व जपानमध्ये बाबासाहेबांच्या स्मृती जपण्यासाठी केलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. 

याशिवाय बुद्धगया येथे महाराष्ट्र भवन उभारण्याचा निर्णयही जाहीर केला. बाबासाहेबांच्या नावाने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अध्यासन स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. 

आठवलेंचे अनोख्या काव्य शैलीत भाषणकेंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अनोख्या काव्य शैलीत भाषणाची सुरुवात केली. चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भव्य ‘भीमसृष्टी’ स्मारक उभारण्याची मागणी केली. तसेच संविधान अत्यंत मजबूत असून ते बदलण्याच्या अफवा निराधार असल्याचे ते म्हणाले.

९८ वारसांना शासकीय सेवेत नियुक्तीचे आदेशअनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील वारसांना शासकीय व निमशासकीय नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय घेणारे महाराष्ट्रातील पहिले राज्य आहे. एकूण ९८ वारसांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय सेवेत नियुक्ती आदेश वितरण केल्याची माहिती देण्यात आली.

महाडमध्ये ‘भीमसृष्टी’ उभारण्याची मागणीआ. भरत गोगावले यांनी रायगड येथे ‘शिवसृष्टी’ आणि महाड येथे ‘भीमसृष्टी’ उभारण्याची मागणी केली. यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले,  महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, खासदार सुनील तटकरे, खा. धैर्यशील पाटील, आ. प्रवीण दरेकर, नगराध्यक्ष सुनील कविस्कर, डॉ. हर्षदीप कांबळे, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलिस अधीक्षक आंचल दलाल उपस्थित होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Mahad: Fadnavis pledges equality at Chavdar Tale centenary, Bhimsrushti demand.

Web Summary : At Chavdar Tale's centenary, CM Fadnavis pledged a discrimination-free society, highlighting the historic struggle for human dignity. He inaugurated purification projects and announced initiatives, including a Maharashtra Bhavan in Bodh Gaya. Ramdas Athawale proposed a Bhimsrushti memorial. 98 families received job orders.
टॅग्स :RaigadरायगडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस