शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एक्स्प्रेस वेवर ट्रक-कारच्या अपघातात पुण्याचे चार ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2019 00:29 IST

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटात आडोशी बोगद्याजवळ ट्रक आणि दोन कारच्या विचित्र अपघातात चौघांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी १०.३०च्या सुमारास हा अपघात झाला.

खोपोली : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटात आडोशी बोगद्याजवळ ट्रक आणि दोन कारच्या विचित्र अपघातात चौघांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी १०.३०च्या सुमारास हा अपघात झाला.पुण्याहून मुंबईच्या दिशेने सिमेंट घेऊन चाललेला ट्रक आडोशी बोगदा पास झाल्यावर चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले व ट्रक मुंबई लेनवरून पुणे लेनमध्ये घुसला आणि उलटला. त्यामुळे झालेल्या भीषण अपघात घडला. ट्रकमध्ये सिमेंटच्या बॅगा भरल्या होत्या. अपघातानंतर सिमेंट रस्त्यावर पसरल्याने पुण्याकडे जाणारी वाहतूक काही काळ बंद होती. बोरघाट पोलीस, आयआरबी पेट्रोलिंग अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी वाहतूक सुरळीत होण्यास मदत केली.दोन कारचे मोठे नुकसानसिमेंट घेऊन चाललेल्या ट्रकचे नियंत्रण सुटून पुणे लेनमध्ये घुसला आणि उलटला. ट्रकच्या धडकेने एक कार १०० फूट खोल दरीत कोसळली, तर एक कार ट्रकखाली सापडल्याने तिचा चक्काचूर झाला.भीषण अपघातात निकिता आंग्रे (२६ रा. पुणे), चित्रा आंग्रे (५९, रा. पुणे), मृणाली पुणेकर(६५, रा. पुणे) व अन्य १ जण असा चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले . यातील अविनाश आंग्रे हे गंभीर असून, त्यांना वाशीतील फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :Accidentअपघात