शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव टोइंग व्हॅनच्या धडकेत चार ठार, महाडमधील दुर्घटना; दोघांची प्रकृती चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 06:25 IST

अपघाताची नोंद महाड तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी टोइंग व्हॅन चालक सुयोग्य सहस्रबुद्धे (२९, रा. चिपळूण) याच्यावर गुन्हा दाखल करीत चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

महाड : महाड तालुक्यातील वीर रेल्वे स्टेशनजवळ उभ्या असलेल्या एका कारला भरधाव टोइंग व्हॅनने दिलेल्या धडकेत चार जण ठार, तर दोन जण जबर जखमी झाले. मृतांमधील सर्वजण महाड शहरातील राहणारे आहेत. गुरुवारी मध्यरात्री ही दुर्घटना घडली.

यासंदर्भातील सविस्तर वृत्त असे की, सूर्यकांत मोरे (रा. नवेनगर), साहिल शेलार, प्रसाद नातेकर (दोघेही रा. कुंभार आळी), समीप मिंडे (रा. दासगाव), सूरज नलावडे (रा. चांभार खिंड) आणि शुभम मातळ हे सहा जण गुरुवारी मध्यरात्री मुंबई-गोवा महामार्गावरून माणगावच्या दिशेने जात होते. वीर रेल्वे स्थानकानजीक त्यांच्या वाहनातील डिझेल संपले. गाडी रस्त्यालगत उभी करून हे सहाही जण गाडीजवळच उभे होते. तेवढ्यात भरधाव वेगाने आलेल्या टोइंग व्हॅनने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होते की, त्यात सर्वजण दहा फूट अंतरापर्यंत फरफटत गेले. तर गाडी ५० फूट लांब फेकली गेली. अपघातात सूर्यकांत मोरे आणि साहिल शेलार यांचा जागीच मृत्यू झाला. 

व्हॅनचालकाला अटकअपघाताची नोंद महाड तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी टोइंग व्हॅन चालक सुयोग्य सहस्रबुद्धे (२९, रा. चिपळूण) याच्यावर गुन्हा दाखल करीत चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू- अपघाताचे वृत्त समजताच महामार्ग वाहतूक पोलिस आणि महाड तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी चार जणांना महाड ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले. - मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नवी मुंबई, मुंबईत हलवण्यात आले. माणगाव येथे आले असता प्रसाद नातेकर यांचा मृत्यू झाला. - तर समीप मिंडे यांचा कळंबोली एमजीएम रुग्णालयात मृत्यू झाला. सूरज नलावडे आणि शुभम मातळ हे जबर जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले आहे. दोघांचीही प्रकृती चिंताजनक आहे.  

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल