चार दिवस उलटूनही ट्रेलर अपघातग्रस्त घरातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 02:49 IST2018-06-19T02:49:26+5:302018-06-19T02:49:26+5:30

दिघी पोर्ट येथे अवजड वाहतूक करणारा भरधाव ट्रेलर म्हसळा खरसई येथील महादेव नाक्ती यांच्या घरात घुसून शनिवारी भीषण अपघात झाला होता.

Four days later the trailer was in an accident house | चार दिवस उलटूनही ट्रेलर अपघातग्रस्त घरातच

चार दिवस उलटूनही ट्रेलर अपघातग्रस्त घरातच

म्हसळा : दिघी पोर्ट येथे अवजड वाहतूक करणारा भरधाव ट्रेलर म्हसळा खरसई येथील महादेव नाक्ती यांच्या घरात घुसून शनिवारी भीषण अपघात झाला होता. अपघातात जीवित हानी झाली नसली तरी नाक्ती यांचे रहाते घर संपूर्ण उद्ध्वस्त झाल्याने संसार उघड्यावर आला आहे. याशिवाय त्यांच्या पशुधनाचेही मोठे नुकसान झाले. अपघात होऊन चार दिवस उलटले तरी अद्याप कॉईलचा ट्रेलर हलवण्यात आलेला नाही. त्यामुळे नाक्ती कुटुंबासह ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे यांनी नुकतीच नाक्ती यांची भेट घेतली. लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
अपघात होऊन तीन दिवस झाले तरी कॉईलचा ट्रेलर हलवण्यात आलेला नाही. ट्रेलर वाहतूक कंपनी योग्य मदत देण्यात टाळाटाळ करीत असल्याची माहिती नाक्ती कुटुंबाने यावेळी दिली.

Web Title: Four days later the trailer was in an accident house