शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर गाड्यांमधील डिझेल चाेरणारी टोळी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 14:19 IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील रायगड जिल्ह्यातील खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत थांबणार्‍या गाडयांमधील डिझेल शिताफीने चोरणारे तीन सराईत गुन्हेगार आणि चोरीचे डिझेल विकत घेणारा गोवंडी (मुंबई) येथील व्यावसायिक अशा चार आराेपींच्या टाेळीला जेरबंद करण्यात आले आहे. 

ठळक मुद्दे गाडयांमधील डिझेल शिताफीने चोरणारे तीन सराईत गुन्हेगार आणि चोरीचे डिझेल विकत घेणारा गोवंडी (मुंबई) येथील व्यावसायिक अशा चार आराेपींच्या टाेळीला जेरबंद करण्यात आले.रायगड जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या विशेष पथकाने बुधवारी हे यश मिळविले आहे.4०० लिटर डिझेल पैकी एकूण 325 लिटर डिझेल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

जयंत धुळप

अलिबाग - मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील रायगड जिल्ह्यातील खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत थांबणार्‍या गाडयांमधील डिझेल शिताफीने चोरणारे तीन सराईत गुन्हेगार आणि चोरीचे डिझेल विकत घेणारा गोवंडी (मुंबई) येथील व्यावसायिक अशा चार आराेपींच्या टाेळीला जेरबंद करण्यात आले आहे. रायगड जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या विशेष पथकाने बुधवारी हे यश मिळविले आहे.

4०० लिटर डिझेल पैकी 325 लिटर डिझेल हस्तगत 

अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांमध्ये संदिप लालजी बिंद (28), नरेश सुरेश गुजर (28), विशाल दिलीप ठाकूर (22) आणि चोरीचे डिझेल स्विकारणारा फैजुल्लाह ऐहसानुल्लाह खान (34) यांचा समावेश आहे. फैजुल्लाह ऐहसानुल्लाह खान यास अटक करून त्यांच्या कडून गुन्ह्यातील एकूण 4०० लिटर डिझेल पैकी एकूण 325 लिटर डिझेल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

पनवेल, वाशी,संगमनेर, मुलुंडमध्ये डिझेल चोरी केल्याची कबूली

अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरूध्द अनेक पोलीस ठाण्यांमध्ये अशाप्रकारे चोरीचे व इतर गुन्हे दाखल असून त्यांनी पनवेल, वाशी,संगमनेर, मुलुंड या परिसरात डिझेल चोरी केल्याची कबुली दिली आहे.

कार मालकांनी दाखल केल्या होत्या तक्रारी

खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत द्रुतगती महामार्गावर थांबलो असताना गाडीतील डिझेची चोरी झाल्याबाबत 12 नोव्हेंबर व 23 नोव्हेंबर 2018 रोजी वेगवेगळ्य़ा गाडी मालकांनी खालापूर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानुसार खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर आणि अपर पोलीस अधीक्षक सचीन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनानुसार रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जे.एच.शेख व सपोनि डि.जी.पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. 

टॅग्स :alibaugअलिबागPetrolपेट्रोलDieselडिझेलMumbai-Pune Express Wayमुंबई-पुणे एक्सप्रेस वेArrestअटक